जंतर-मंतर येथील आंदोलन : तरुणांच्या संघर्षाचा विजय......
शनिवार, 25 जुलाई 2026
Comment
दिल्लीतील जंतर-मंतर येथे विद्यार्थ्यांच्या विविध मागण्यांसाठी सुरू असलेल्या दीर्घकालीन आंदोलनाने संपूर्ण देशाचे लक्ष वेधून घेतले. शिक्षण व्यवस्थेतील पारदर्शकता, विद्यार्थ्यांना न्याय आणि भ्रष्टाचारमुक्त व्यवस्था या मागण्यांसाठी हजारो युवक-युवती शांततापूर्ण मार्गाने आंदोलन करत होते.
या आंदोलनादरम्यान अनेक आंदोलकांनी सरकारच्या कार्यपद्धतीवर टीका करत लोकशाही मूल्यांचे संरक्षण करण्याची मागणी केली. दीर्घकाळ सुरू असलेल्या या संघर्षामुळे शिक्षण क्षेत्रातील अनेक प्रश्न राष्ट्रीय चर्चेचा विषय बनले.
आंदोलनानंतर केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. या घडामोडीकडे अनेकांनी आंदोलनाच्या नैतिक विजयाच्या दृष्टीने पाहिले, तर काहींनी याकडे राजकीय निर्णय म्हणूनही पाहिले. मात्र, विद्यार्थ्यांच्या प्रश्नांक गांभीर्याने लक्ष वेधण्यात या आंदोलनाची महत्त्वाची भूमिका राहिली.
लोकशाहीमध्ये शांततापूर्ण आंदोलन हे नागरिकांचे घटनात्मक अधिकार आहे. विद्यार्थ्यांचा आवाज ऐकला जाणे, शिक्षण व्यवस्था अधिक पारदर्शक आणि उत्तरदायी होणे, तसेच गुणवत्तापूर्ण शिक्षणाची हमी मिळणे ही काळाची गरज आहे.
जंतर-मंतरवरील हे आंदोलन केवळ एका व्यक्तीच्या राजीनाम्यापुरते मर्यादित नसून, शिक्षण व्यवस्थेत सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी तरुणांनी दिलेल्या संघर्षाचे प्रतीक म्हणून कायम स्मरणात राहील. लोकशाहीमध्ये सत्य, न्याय आणि जनतेचा आवाज यांचाच शेवटी विजय होतो, हा संदेश या आंदोलनातून अधोरेखित झाला.
जिल्हाध्यक्ष अखिल भारतीय मराठी
साहित्य परिषद जिल्हा भंडारा.
0 Response to "जंतर-मंतर येथील आंदोलन : तरुणांच्या संघर्षाचा विजय......"
एक टिप्पणी भेजें