जागतिक लोकसंख्या दिनानिमित्त...
शुक्रवार, 10 जुलाई 2026
Comment
करा नियोजन
भाऊ मायी सांगी हाय करा नियोजन ।
टाळा जीवंत मरन करा तुमी नियोजन ।।धृ.।।
अंगाले कपळा नाय, पोट्टेयले पाटी नाय ।
पाटी-लेखन-कपळे एकमेकाचे घेत हाय ।
बायकोलेबी काय सांगू,फाटके लुगळे हाय ।
मले त् इचारूच नोका,चोलनाच फाटला हाय ।
म्हून मायी सांगी हाय,करा नियोजन ।।१।।
संसार माह्या सुखी व्होते दोन लेकरं ।
कोनाले काय मिळत नाय झाले डझनभर ।
सिक्सनाइना लेकर हाय करूनी मरमर ।
कामय होत नाय बायकोच्यान तरतर ।
म्हून मायी सांगी हाय करा नियोजन ।।२।।
सरकार तरी म्हने मले कर नियोजन ।
तव्हाच तुह्य जाईन लेका सुखात जीवन ।
नियोजना इना जीवनाचे हाय मरन ।
लायन्या कुटुंबातले पोरं व्हईल महान ।
म्हून मायी सांगी हाय करा नियोजन ।।३।।
जवा तुमी दोन लेकराले जनम दयान ।
पाटी,पुस्तक कापळ सर्वेयले भेटनं ।
साक्षरतेचं परमान मंग लईच वाळनं ।
करा नियोजन टाळा जीवंत मरन ।
म्हून मायी सांगी हाय करा नियोजन ।।४।।
संत कबीर कवीराज पुरस्कार प्राप्त
कवी व अभंगकार
अमरावती.८०८७७४८६०९
('निखारा' या काव्यसंग्रहातून साभार )
दि .११ जुलै २०२६ रोजी असलेल्या "जागतिक लोकसंख्या दिना"निमित्त प्रा.अरुण बुंदेले यांच्या 'निखारा' या काव्यसंग्रहातील 'करा नियोजन' वऱ्हाडी कविता वाचकांसाठी .साप्ताहिक जनता की आवाज या वृत्तपत्रात प्रकाशित करीत आहोत.
0 Response to "जागतिक लोकसंख्या दिनानिमित्त..."
एक टिप्पणी भेजें