निसर्ग राजा कोपला की काय?
मंगलवार, 14 जुलाई 2026
Comment
• शेतातील धान रोहिणीचे परे शेतात पाणी नसल्यामुळे सुखण्याच्या मार्गावर शेतकरी चिंतेत
संजीव भांबोरे
"साप्ताहिक जनता की आवाज"
भंडारा :- विशेष प्रतिनिधी -मागील पंधरा दिवसापासून निसर्गाने दगा दिल्यामुळे शेतातील परे सुकण्याच्या मार्गावर असून शेतकरी चिंतेत पडलेला आहे. निसर्ग राजा कोपला तर शेतकऱ्यांनी बीज, खत खरेदी करून घेतली. त्यामुळे शेतकरी वर्ग आर्थिक अडचणी सापडणार आहे व कर्जाच्या डोंगर त्यांच्यासमोर उभा राहणार आहे व अशा परिस्थितीत त्याला आत्महत्यास सुद्धा समोर जावे लागणार आहे. शेतातील परे रोवनी योग्य झाली असून शेतात पाणी नसल्यामुळे परे सुकण्याच्या मार्गावर आहेत.अशातच शेतकरी दादांनी काय करावं .? धरणी माता रडत आहे. चातक पक्षी मेगांची वाट बघत आहे .मोर पिसारा फुलविण्यास मेघांची आतुरतेने वाट बघत आहे. शेतकरी मित्र पाणी म्हणून आकाशातील ढगाकडे टक लावून बघत आहे. परंतु मागील पंधरा दिवसापासून निसर्गाने पाठ फिरवली असल्याने शेतकरी वर्ग चिंतेत सापडलेला आहे.
0 Response to "निसर्ग राजा कोपला की काय?"
एक टिप्पणी भेजें