अमरावती जिल्ह्याचे सुपुत्र प्रा.डाॅ.रवि दलाल यांच्या निवडक कथा चा लोकार्पण.
शनिवार, 4 जुलाई 2026
Comment
• नागपुरात रंगणार वाङ्मयीन सोहळा, ‘रवी दलाल यांच्या निवडक कथा’चे प्रकाशन.
अविनाश गोंडाणे
"साप्ताहिक जनता की आवाज"
अमरावती ( वि.प्र.) :- नागपूर येथील संकलनकार आणि लेखक विभूतीचंद्र गजभिये संपादित ‘रवी दलाल यांच्या निवडक कथा’ या कथासंग्रहाचा भव्य पुस्तक प्रकाशन सोहळा शनिवार, ४ जुलै २०२६ रोजी लष्करीबाग येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मिशन सभागृहात (मुकुंदराव आंबेडकर चौक, आवळे बाबू चौक) आयोजित करण्यात आला आहे. हा सोहळा अत्यंत उत्साहात पार पडणार असून, या वाङ्मयीन सोहळ्याची नागपूरच्या साहित्यिक वर्तुळात मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे.
या कार्यक्रमाचे अध्यक्षपद माजी सनदी अधिकारी (I.A.S.) तथा संविधान फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष मा. ई. झेड. खोब्रागडे भूषविणार आहेत, तर मुख्य उद्घाटन नागपूर प्रदेशचे भूमी अभिलेख उपसंचालक मा. डॉ. लालसिंग मिसाळ साहेब यांच्या हस्ते संपन्न होणार आहे.
याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून मा. बाळासाहेब काळे आणि मा. विकास राऊत उपस्थित राहणार आहेत. तसेच कार्यक्रमाला प्रमुख मार्गदर्शक म्हणून ज्येष्ठ साहित्यिक व विचारवंत मा. डॉ. रवि दलाल आणि मा. अशोकभाऊ सरस्वती बौद्ध यांचे बहुमोल मार्गदर्शन लाभणार आहे. या सोहळ्याला मा. अॅड. हंसराज भांगे, मा. रामभाऊ डोंगरे आणि मा. वीरेंद्रबाबू इंगळे यांची प्रमुख उपस्थिती असेल.
सकाळी १०:३० वाजता सुरू होणारा हा दिमाखदार सोहळा दुपारी १:०० वाजेपर्यंत रंगणार आहे. या दरम्यान दीपप्रज्वलन, मान्यवरांचे स्वागत, कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि उद्घाटन पर भाषणे पार पडतील. यानंतर मुख्य पुस्तकाचे प्रकाशन आणि उपस्थित मान्यवरांचे वैचारिक मार्गदर्शन होणार आहे. शेवटी अध्यक्षीय भाषणाने सोहळ्याचा मुख्य समारोप होईल. हा संपूर्ण कार्यक्रम मराठी साहित्याला समृद्ध करणारा ठरणार असून, नागपूर आणि परिसरातील सर्व साहित्यप्रेमी व रसिकांनी या सोहळ्याला मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
अविनाश गोंडाणे अमरावती
9923264193
0 Response to "अमरावती जिल्ह्याचे सुपुत्र प्रा.डाॅ.रवि दलाल यांच्या निवडक कथा चा लोकार्पण."
एक टिप्पणी भेजें