तुमसरमधील घुसखोरी प्रकरणात पोलिसांच समोर आहान..'
शुक्रवार, 17 जुलाई 2026
Comment
'त्या' दोन खाकी वर्दीधारकांवर कारवाई होणार का?.एक प्रश्न!.
"साप्ताहिक जनता की आवाज"
वृत्तपत्र प्रतिनिधी
तुमसर :- दत्तात्रेयनगरातील एका महिलेच्या घरात बेकायदेशीरपणे शिरून गोपनीयता आणि सन्मानाचा संकोच केल्याचे कथित घुसखोरी प्रकरण आता थेट जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे पोहोचले आहे. या प्रकरणातील पोलीस प्रशासनाच्या संशयास्पद भूमिकेमुळे आणि दिरंगाईमुळे आता पोलिसांच्याच समोर तपासाची आव्हानात्मक भुमिका सुरू झाली आहे. पीडित महिलेने आरोप केला आहे की, काही अज्ञात गुंडांसह दोन पोलीस कर्मचारी बेकायदेशीरपणे तिच्या घरात शिरले. हा संपूर्ण धक्कादायक प्रकार घराबाहेरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात स्पष्टपणे कैद झाला आहे. असे ठोस पुरावे उपलब्ध असतानाही स्थानिक पोलिसांनी अद्याप गुन्हा नोंदविला नसल्याचा आरोप होत आहे. यामुळे तुमसर पोलिसांच्या कार्यपद्धतीवर आणि निष्पक्षतेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
'कायदेशीर प्रक्रियेचे पालन न करता महिलेच्या घरात शिरणे हा तिच्या गोपनीयतेचा भंग आहे,' असे स्पष्ट निरीक्षण नागपूर उच्च न्यायालयाने अलीकडेच नोंदविले होते. न्यायालयाच्या आदेशाला तुमसरमध्ये हरताळ फासला जात आहे का?, असा संतप्त सवाल नागरिक उपस्थित करीत आहेत. संबंधित पोलीस कोणत्या आदेशावरून तिथे गेले होते ? त्यांची स्टेशन डायरी, ड्युटी चार्ट आणि वायरलेस लॉगमध्ये नोंद आहे का?.की कोणाच्या तरी खासगी इशाऱ्यावर हे पोलीस काम करत होते, या सर्व प्रश्नांची उत्तरे शोधणे आता जिल्हा पोलीस अधीक्षकांसमोर मोठे आव्हान आहे. घटनेचे सीसीटीव्ही फुटेज असतानाही पोलीस ढिम्म का? जिल्हा पोलीस अधीक्षक या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून दोषींवर तत्काळ कारवाई करणार की, हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न केला जाईल, याकडे संपूर्ण भंडारा जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
0 Response to "तुमसरमधील घुसखोरी प्रकरणात पोलिसांच समोर आहान..'"
एक टिप्पणी भेजें