-->
२७ सप्टेंबर रोजी नांदेड येथे राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळा.

२७ सप्टेंबर रोजी नांदेड येथे राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळा.


संजीव भांबोरे 
"साप्ताहिक जनता की आवाज" 

नांदेड :- समाजात समता, स्वातंत्र्य, बंधुता, न्याय आणि मानवतेची मूल्ये दृढ करण्यासाठी विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्ती व संस्थांचा सन्मान करण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या "राष्ट्रीय समता गौरव पुरस्कार – २०२६" या राज्यस्तरीय पुरस्कारासाठी पात्र व्यक्ती, संस्था आणि सामाजिक संघटनांकडून प्रस्ताव (नामांकने) मागविण्यात येत आहेत.
मातोश्री लक्ष्मीबाई ठाकुर बहुउद्देशीय सेवाभावी संस्था, नांदेड आणि मायडी बहुउद्देशीय सेवाभावी संस्था, नांदेड यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार, दि. २७ सप्टेंबर २०२६ रोजी नांदेड येथे हा भव्य पुरस्कार वितरण सोहळा आयोजित करण्यात आला आहे.
या पुरस्कारासाठी समाजसेवा, शिक्षण, पत्रकारिता, साहित्य, कला, आरोग्य, महिला सक्षमीकरण, युवा नेतृत्व, उद्योग, पर्यावरण, संविधान जनजागृती, दिव्यांग सेवा, ग्रामीण विकास, सांस्कृतिक, क्रीडा तसेच इतर विविध क्षेत्रांत उल्लेखनीय योगदान देणाऱ्या व्यक्ती व संस्थांचे प्रस्ताव आवश्यक माहिती, कार्याचा संक्षिप्त परिचय आणि संबंधित कागदपत्रांसह आयोजकांकडे पाठवावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.
प्राप्त सर्व नामांकनांची स्वतंत्र निवड समितीकडून पारदर्शक पद्धतीने छाननी करण्यात येणार असून, निवड झालेल्या पुरस्कारार्थींना स्मृतिचिन्ह, सन्मानपत्र, शाल, श्रीफळ आणि सन्मानचिन्ह प्रदान करून गौरविण्यात येईल.
समाजासाठी निःस्वार्थपणे कार्य करणाऱ्या व्यक्तींचा गौरव करण्यासाठी विविध सामाजिक संस्था, शैक्षणिक संस्था, पत्रकार, साहित्यिक, सामाजिक कार्यकर्ते तसेच नागरिकांनी अधिकाधिक पात्र व्यक्तींची नावे पुरस्कारासाठी सुचवावीत, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
कार्यक्रमाचे स्थळ, वेळ व प्रमुख पाहुण्यांची नावे लवकरच जाहीर करण्यात येणार आहेत.
प्रस्ताव पाठविण्यासाठी संपर्क :
शंकर सिंह ठाकुर
संस्थापक अध्यक्ष
मातोश्री लक्ष्मीबाई ठाकुर बहुउद्देशीय सेवाभावी संस्था, नांदेड
📞 मो.: ७०८३६८५६३६
मारोती बा. शिकारे
संस्थापक अध्यक्ष
मायडी बहुउद्देशीय सेवाभावी संस्था, नांदेड
📞 मो.: ८९७५७३०८१८
••••

0 Response to "२७ सप्टेंबर रोजी नांदेड येथे राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळा."

एक टिप्पणी भेजें

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article