-->
रेंगोळा ते ढिवरखेडा पालांदूर शाखा कालवा फुटला!..

रेंगोळा ते ढिवरखेडा पालांदूर शाखा कालवा फुटला!..


• १५ वर्षातील पाणीपुरवठ्याचा प्रयत्न फसला!.

.                         फुटलेला कालवा

           नरेंद्र मेश्राम 
"साप्ताहिक जनता की आवाज"
 
भंडारा :- नेरला लिफ्ट अंतर्गत लाखनी तालुक्यातील रेंगोळा ते ढीवरखेडा ८४०० मिटर लांबीचा पालांदूर शाखा कालवा सायगाव जवळ सुरक्षित भिंत कोसळल्याने कालवा फुटला. गत पंधरा वर्षापासून कालव्याचे काम झाले होते. मात्र पाणी प्रवाहित न झाल्याने कालव्याची परिपक्वता कळली नाही. आज बुधवारला कालव्यात पाणी येताच संरक्षक भिंती जवळून दोन्ही बाजूला कालवा फुटला. ह्या कालव्याची तपासणी करून घ्यावी लागेल तेव्हा अधिकारी यांना दिसेल की कालव्याची तपासणी केली पाहिजे तेव्हा अधिकारी यांना दिसेल की कालव्याची अवस्था कशी काय झाली आहे.
  कालव्याची सपाही करूनच कालव्याचे पाणी सोडावे तरच जलदगती वाढेल आणि ते पाणी शेवटच्या कास्तकार यांना फायेशीरच होऊ शकतो.
जिल्ह्यातील शेतकऱ्यांना वरदान ठरलेला गोसेखुर्द धरण अजूनही शेतकऱ्यांना दिवा स्वप्नच ठरत आहे. शेतकरी संकटकालीन परिस्थितीत भोसे खुर्च्या पाण्याकरिता आसुसलेला असताना पहिल्याच प्रयत्नात फुटलेल्या कालव्यामुळे बांधकामाच्या मजबुती विषयी प्रश्नचिन्ह उभा ठाकलेला आहे. 

कालवा अर्थात नहराला पाणी सोडण्यापूर्वी स्वच्छता अपेक्षित होती. जिथे जिथे पाण्याला अडथळा निर्माण होतो त्याच्या मागे पाण्याचा खूप मोठा दाब तयार होतो. त्या दाबामुळे कच्च्या बांधकामाचा प्रभाव पडून कालवा फुटण्याचा प्रकार लाखनी तालुक्यातील सायगाव जवळ घडला. उताराच्या दिशेने पाण्याचे सूक्ष्म नियोजन पूर्वी घडले असते तर कदाचित ढिवरखेडा टेल पर्यंत पाणी पोहोचले असते. 

कालव्याच्या संरक्षक भिंतीचे काम सदोष असल्याने कालवा फुटला. वरिष्ठ प्रशासनाने तत्परतेने दखल घेत आम्हा शेतकऱ्यांना संकटकालीन परिस्थितीत सहकार्य करावे.
बबलू वैरागडे लाभार्थी शेतकरी 

कोट: फुटलेल्या कालव्याची युद्ध स्तरावर दिवस-रात्र एक करून दुरुस्ती करिता प्रयत्न केला जाईल. शेतकऱ्यांनी संयम राखत सहकार्य करावे. अगदी दोन ते तीन दिवसात कालव्याला सुरळीत पाणी प्रवाहित होईल यासाठी आमचे प्रयत्न कटिबद्ध आहेत.
तुषार धमगाये 
कनिष्ठ अभियंता उपविभाग लघुपाटबंधारे अंबाडी

0 Response to "रेंगोळा ते ढिवरखेडा पालांदूर शाखा कालवा फुटला!.."

एक टिप्पणी भेजें

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article