-->
पातुर विवरा निर्गुणा नदीतून हजारो रुपयांची अवैध रेती उत्खनन, तहसीलदारांचे दुर्लक्ष.

पातुर विवरा निर्गुणा नदीतून हजारो रुपयांची अवैध रेती उत्खनन, तहसीलदारांचे दुर्लक्ष.



        गुलाब भाऊ अंभोरे
 साप्ताहिक जनता की आवाज.
 
 पातुर (प्रतिनिधी) :-  तहसील अंतर्गत येत असलेले विवरा या गावाच्या बाहेरून फार मोठी निर्गुण नदी वाहतो. आणि एक दोन नदीला पूर पण गेलेआहेत. विवरा निर्गुणा नदीतून हजारो रुपयांचा अवैध रेती खोदून जाऊ लागली. लागली तसेच मुरूम उत्खनन खूप खूप झपाट्याने सुरू आहे. त्याचबरोबर रेतीचे उत्खनन झपाट्याने होत आहे .कोणाच्या आशीर्वादाने तर तहसीलदार पातुर यांच्या आशीर्वादाने .मग यात गावातील तलाठी कोठे असतो , गावात येते की नाही, का तलाठ्यापासून तर तहसील पर्यंत याची मिली भगत आहे का अशी चर्चा गावकऱ्यांमध्ये रंगली आहे . गावात तलाठी येते की नाही याची खबर तहसीलदार राहुल वानखडे का, घेत नाहीत शासनाचा लाखो रुपयांचा महसूल बुडाला आहे परंतु याचे तहसीलदारांना काही घेणे देणे नाही . बऱ्याच गावकऱ्यांना हे सुद्धा माहित नाही विवरा येथे तलाठी कोण आहे आहे. रेतीची तस्करी करण्यावर कठोर कारवाई होणार का? की मिली बघत होणार, रेतींची कोणत्याच प्रकारची रॉयल्टी नसताना विवरा नदीतून दिवसाढवळ्या सर्रास रेती खोदून आणि गाळून लंपास केल्या जाते या गोष्टीला जबाबदार कोण?

0 Response to "पातुर विवरा निर्गुणा नदीतून हजारो रुपयांची अवैध रेती उत्खनन, तहसीलदारांचे दुर्लक्ष."

एक टिप्पणी भेजें

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article