लोकशाहीर - साहित्यसम्राट अण्णाभाऊ साठे यांच्या दि.१८ जुलै २०२६ ला असलेल्या ५७ व्या स्मृतिदिनानिमित्त अभंगकार व साहित्यिक प्रा.अरुण बाबारावाजी बुंदेले यांचा अभंग येथे वाचकांसाठी प्रकाशित करीत आहोत.
शनिवार, 18 जुलाई 2026
Comment
( अभंग )
अण्णाभाऊ साठे
स्मरतात आज ।
थोर साहित्यिक ।।
कीर्ती जागतिक ।
अण्णाभाऊ ।।१।।
अण्णाभाऊ साठे ।
साहित्य अक्षर ।।
समता विचार ।
लेखनीचा ।।२।।
प्रेरणेचे स्थान ।
कष्टकरी प्रजा ।।
कामगार राजा ।
दूरद्रष्टा ।।३।।
लावियले नाही ।
पाख कल्पितांचे ।।
भान वास्तवाचे ।
साहित्यात ।।४।।
समता नि न्याय ।
ज्योत संघर्षाची ।।
लेखनी भाऊंची ।
फकिरात ।।५।।
साहित्य सम्राट ।
वास्तवाची धार ।।
लेखनीने वार ।
दंभावर ।।६।।
अण्णाभाऊंना मी ।
करितो नमन ।।
करांनी वंदन ।
कोटी कोटी ।।७।।
लोकशाहीर आण्णाभाऊ साठे
राज्यस्तरीय उत्कृष्ट साहित्यिक पुरस्कार प्राप्त.
अमरावती .८०८७७४८६०९
( प्रा.अरुण बुंदेले यांच्या 'अभंग तरंग' या काव्यसंग्रहातून साभार )
0 Response to "लोकशाहीर - साहित्यसम्राट अण्णाभाऊ साठे यांच्या दि.१८ जुलै २०२६ ला असलेल्या ५७ व्या स्मृतिदिनानिमित्त अभंगकार व साहित्यिक प्रा.अरुण बाबारावाजी बुंदेले यांचा अभंग येथे वाचकांसाठी प्रकाशित करीत आहोत."
एक टिप्पणी भेजें