डॉ. संतोष शिवदास आमले यांच्या वाढदिवसानिमित्त साप्ताहिक युवक आधार प्रकाशन सोहळा सपन्न.
मंगलवार, 28 जुलाई 2026
Comment
• साप्ताहिक युवक आधार चे मुख्य संपादक पदाची जबाबदारी मुकुंद शंकर कांबळे यांच्या वर.
संजीव भांबोरे
"साप्ताहिक जनता की आवाज"
पनवेल :- दैनिक युवक आधारच्या वतीने शनिवार, दि. २५ जुलै २०२६ रोजी आयोजित साप्ताहिक युवक आधार प्रकाशन सोहळा तसेच संपादक डॉ. संतोष शिवदास आमले यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.
यावेळी मुख्य संपादक मुकुंद शंकर कांबळे असलेल्या साप्ताहिक युवक आधारच्या पहिल्या अंकाचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले.
प्रमुख पाहुण्यांनी दैनिक युवक आधारच्या निर्भीड पत्रकारितेचे आणि सामाजिक बांधिलकीच्या कार्याचे कौतुक करत साप्ताहिक युवक आधारच्या नव्या प्रवासासाठी शुभेच्छा दिल्या. सामाजिक न्याय, सर्वसामान्यांचे प्रश्न आणि सत्य पत्रकारितेची परंपरा अधिक सक्षम करण्यासाठी हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरेल, असा विश्वास उपस्थितांनी व्यक्त केला..
कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून रामदास शेवाळे साहेब नगरसेवक पनवेल जिल्हा प्रमुख शिवसेना प्रमुख,प्रभाकर कांबळे अध्यक्ष RPI पनवेल महानगर जिल्हा,संपादक मंदार दोंदे,सुभाष गायकवाड अध्यक्ष भीम शक्ती देवदास गायकवाड, अध्यक्ष पनवेल प्रेस क्लब,शंकर वायदंडे -अध्यक्ष लोकशाही पत्रकार संघ
विजय सूर्यवंशी संस्थापक अध्यक्ष पुरोगामी पत्रकार सेवा संघ, संजय पवार संपादक लोकांकित, मेजर बसवदाज गोळे आर्मी, संपादक मोहन गायकवाड, संपादक मंदार दोंदे तसेंच अध्यक्षा परिनिता फाउंडेशन, साक्षी सागवेकर मॅडम, अरुणकुमार म्हेत्रे, पत्रकार लोकमत, मयूर तांबडे पत्रकार, लोकमत संपादक अण्णासाहेब आहेर, संपादक सुनील वारगडा, संपादक सनिप कलोते, संपादक अनिल रॉय, संपादक लालचंद यादव, जेष्ठ पत्रकार शिर्के,संपादक शाबीर शेख, संपादक असीम शेख, संपादक विशाल सावंत, संपादक दिपाली पावसकर, संपादक अक्षय कांबळे, पत्रकार राम शिंदे कार्यकरी संपादकळ, राजपाल शेगोकार, राजेंद्र वणवे, उपस्थित होते. कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थितांनी डॉ. संतोष शिवदास आमले यांना वाढ दिवसाच्या शुभेच्छा देत दैनिक युवक आधार व साप्ताहिक युवक आधार यांच्या यशस्वी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
-
0 Response to "डॉ. संतोष शिवदास आमले यांच्या वाढदिवसानिमित्त साप्ताहिक युवक आधार प्रकाशन सोहळा सपन्न. "
एक टिप्पणी भेजें