-->
"हैदराबादमध्ये आधुनिक शेतीचे धडे.

"हैदराबादमध्ये आधुनिक शेतीचे धडे.

        संजीव भांबोरे 
"साप्ताहिक जनता की आवाज"
 
नागपूर :- महाराष्ट्र शासन कृषि विभाग, कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा आत्मा अंतर्गत शेतकऱ्यांचा आंतरराज्यीय अभ्यासदौरा व प्रशिक्षण"
 दि. २६ जुलै २०२६ ला आयोजित करून भंडारा जिल्ह्यातील एकूण ४० शेतकऱ्यांचा अभ्यास दौरा राष्ट्रीय प्रशिक्षण राष्ट्रीय प्रबंधन वनस्पती स्वास्थ्य संस्था ,हैदराबाद येथे प्रकल्प संचालक आत्मा भंडारा उर्मिला चिखले यांचे उपस्थितीत हिरवे झेंडी दाखवून आयोजित करण्यात आला.

आत्मा (ATMA) अंतर्गत शेतकऱ्यांचे ज्ञान, कौशल्य व आधुनिक शेतीविषयक दृष्टीकोन विकसित करण्याच्या उद्देशाने राष्ट्रीय वनस्पती स्वास्थ प्रबंधन संस्था (National Institute of Plant Health Management – NIPHM), हैदराबाद येथे आंतरराज्यीय शेतकरी अभ्यासदौरा व प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले.
या अभ्यासदौऱ्यात सहभागी शेतकऱ्यांना पीक संरक्षण, एकात्मिक कीड व रोग व्यवस्थापन, जैविक व नैसर्गिक शेती, कीडनियंत्रणातील आधुनिक तंत्रज्ञान, कृषीतील नवकल्पना, ड्रोन तंत्रज्ञानाचा वापर, अन्नसुरक्षा तसेच हवामान बदलाच्या पार्श्वभूमीवर शाश्वत शेती पद्धती याबाबत तज्ज्ञांकडून सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.
प्रशिक्षणादरम्यान संस्थेतील विविध प्रयोगशाळा, प्रात्यक्षिक विभाग व अत्याधुनिक सुविधा यांना भेट देऊन शेतकऱ्यांनी प्रत्यक्ष निरीक्षण केले. आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती प्रत्यक्ष अनुभवातून मिळाल्याने सहभागी शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले.
या अभ्यासदौऱ्यामुळे शेतकऱ्यांना आपल्या शेतात आधुनिक, शाश्वत व पर्यावरणपूरक शेती तंत्रज्ञानाचा अवलंब करण्यासाठी निश्चितच प्रेरणा मिळणार असून उत्पादनवाढीसह गुणवत्तापूर्ण शेतीस चालना मिळेल, असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला.
सदर अभ्यास दौरा दिनांक २७ ते २९ जुलै या कालावधीत निवासी अभ्यासद्वारा असून दिवसेंदिवस वाढत्या कीटकनाशके, तणनाशक आणि रासायनिक खतांच्या अतिरेक वापरामुळे जमिनीचे,भौतिक,रासायनिक आणि जैविक गुणधर्माचा ऱ्हास, उपयुक्त पर्यावरणाचा ऱ्हास वायू प्रदूषण विविध सद्यस्थितीत होणारे मानवी आरोग्यावर परिणाम विशेषता उत्पादन घेण्यासाठी रासायनिक निष्टांच्या तिरक वापर आणि वाढती महागाई या सर्व गोष्टींमुळे शेतकऱ्यांना तंत्रज्ञानाचा वापर करून उत्पादनासाठी लागणाऱ्या निविष्ठा स्वतः तयार करून शाश्वत उत्पादन घेऊन सुदृढ बनवणे हा महत्त्वाचा उद्देश आहे.

0 Response to ""हैदराबादमध्ये आधुनिक शेतीचे धडे."

एक टिप्पणी भेजें

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article