पुल्लर गाव शेजारील तलावाची पावसाळ्यात होणारी गळती थांबवा - नारायण उदापुरे.
शुक्रवार, 17 जुलाई 2026
Comment
संजीव भांबोरे
"साप्ताहिक जनता की आवाज"
नागपुर :- जिल्ह्यात भिवापुर पासून उत्तर दिशेला 12 Km अंतरावर पुल्लर गाव आहे . आणि गावा शेजारी थोड्या उंचावर गाव तलाव आहे . पावसाळ्यात तलाव पूर्ण भरल्यास तलावाच्या आतील काठाने पाण्याची गळती होत राहते . पर्यायाने गळतीमुळे गावातील काही घरांना ओलावा, तर काही घरांना पाण्याचे झरे लागतात . [ परिणाम - घरांना सतत ओलाव्यामुळे, संधिवात, तिडक्या वात, चक्कर येणे, पाय सुजन, अनेक बिमाऱ्या थंडीमुळे घडूण येतात ] यातून सावधानतः बाळगण्यासाठी स्थानिक पातळीवर नेतृत्व घेऊन तलावाची विशीष्ट ठिकाणवरून येणारी गळती मुळे नागरीकांना होणाऱ्या त्रासांबद्धल शासन, प्रशासन आणि स्थानिक जनप्रतिनिधी यांनी या संदर्भात प्रयत्नशील पाऊल उचलावे असे मागणी नागपूर जिल्हा ओबीसी सेवा संघाचे अध्यक्ष नारायण उदापूरे यांनी केलेली आहे
0 Response to "पुल्लर गाव शेजारील तलावाची पावसाळ्यात होणारी गळती थांबवा - नारायण उदापुरे."
एक टिप्पणी भेजें