-->
भिवापूर तालुक्यातील पुल्लर येथे तलावातील पाणी सोडण्याच्या मार्गावर विहिरीत घाणीचे साम्राज्य.

भिवापूर तालुक्यातील पुल्लर येथे तलावातील पाणी सोडण्याच्या मार्गावर विहिरीत घाणीचे साम्राज्य.



 संजीव भांबोरे 
"साप्ताहिक जनता की आवाज"

नागपुर :- जिल्ह्यातील 75 Km अंतरावर भिवापुर हे भव्य तालुका आहे . आणि भिवापुर पासून उत्तर दिशेला 12 Km अंतरावर पुल्लर हे 1500 लोकसंख्येचं छोटंसं गाव आहे . परंतु साधारणतः अंदाजे २ शतकाअगोदर याच गावात गावतलाव मालगुजारी ताब्यात होते , परंतु हेच तलाव आता काळानुरूप जलसिंचन विभाग अर्थात शासनाकडे गेले.

.                            तलाव

 तलावाचे चित्र फोटोमध्ये बघावे .या तलावापासून गावातील बरीचशी शेती ओलीत करता येते . आणि पाणी सोडण्याचा एक विशीष्ट मार्ग आहे, तलावातील पाणी सोडण्याचा परंतू याच मार्गावर एक छोटीशी विहीर आहे [ लहाण तुडुम म्हणतात त्याला ]परंतू ती विहीर पुर्ण चुंगळ्या, काडी कचरा, घाण वस्तु, काड्या, vestege कचरा याने व मातीने बुजवून टाकली, पर्यायाने पाणी सोडण्याचा मार्ग पूर्ण बंद पडला . नंतर बघता याच तलावाने गावातील 30 ते 40 घरांना ओलावा येते तर काही घरांना तलाव पूर्ण भरल्यावर पाझर फुटतो, मी - नारायण उदापुरे OBC सेवा संघ अध्यक्ष ,नागपुर .शासनाला कळकळीची नम्र विनंती करतो की, विनंती 1 ] तलावाचं खोलीकरण करावं २ ] तलावाला पाझर फुटण्याचा मार्ग निश्चीत करून त्यांच व्यवस्थापण करावं 3 ] तलावाच पाणी सोडण्याचा मार्गावरील विहीरीतील गाळाचं उपसा करुण वा गाळ काढूण पाण्याचा मार्ग मोकळा करावा 4 ] तलावाच्या पाण्याने पाझर फुटणाऱ्या घरांना किंवा नुकसान होणाऱ्या घरांना आर्थिक मदत शासनाने प्रदान करावी . अशी मागणी ओबीसी सेवा संघ नागपूर जिल्ह्याचे अध्यक्ष नारायण उदापूरे यांनी केलेली आहे.

0 Response to "भिवापूर तालुक्यातील पुल्लर येथे तलावातील पाणी सोडण्याच्या मार्गावर विहिरीत घाणीचे साम्राज्य."

एक टिप्पणी भेजें

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article