-->
भिवापूर तालुक्यातील पुल्लर येथे प्रवासी निवाऱ्याची मागणी.

भिवापूर तालुक्यातील पुल्लर येथे प्रवासी निवाऱ्याची मागणी.


                    संजीव भांबोरे 
      "साप्ताहिक जनता की आवाज"
 
 नागपुर :- पासून 75 Km अंतरावर भिवापुर तालुका आहे. आणि भिवापुर पासुन उत्तर दिशेला 12 Km अंतरावर पुल्लर हे 1500 लोकसंख्या असणारं भरगच्च वसतीचं गाव आहे . पुल्लर पासून भिवापुर ला रोज ग्रामस्थ + शाळकरी मुले + वृद्ध अनेक लोक सरकारी वाहणाने [ st ] प्रवास करतात.

 येणा जाणा करतात . परंतु दुःख व चिंतेची भयावह बाब म्हणचे पुल्लर बायपास येथे प्रवासी थांबा बसस्टॉप नाही . उन, वारा, पाऊस, तसेच विजांचा गडगडाट, प्रचंड वादळ वारा, अशात थांबावं कुटं हा महाभयंकर प्रश्न ग्रामस्थांना, शाळकरी मुलांना पडतोयं, अशातं महत्वाचां म्हणजे स्थानिक पातळीवर लोकप्रतिनिधी यांनी कसुन नेतृत्व घेऊन पुल्लर बायपास येथे प्रवासी थांबा म्हणजेच बसस्टॉपचे नियोजन करने आज अत्यंत काळाची गरज आहे . या ,संदर्भात शासनाने लक्ष देऊन पुल्लर बायपास येथे बसस्टॉप उभारण्यात यावे अशी मागणी ओबीसी सेवा संघाचे नागपूर जिल्हा अध्यक्ष नारायण उदापूरे यांनी एका पत्रकाद्वारे केलेली आहे.

0 Response to "भिवापूर तालुक्यातील पुल्लर येथे प्रवासी निवाऱ्याची मागणी."

एक टिप्पणी भेजें

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article