तुमसर रोड रेल्वे स्थानकाचे 'अमृत' नाव, पण प्रवाशांचे हाल!..
शनिवार, 18 जुलाई 2026
Comment
• पावसाळ्यात महिला,ज्येष्ठ नागरिक आणि चिमुकल्यांची प्रचंड गैरसोय रेल्वे प्रशासनाच्या नियोजनावर तीव्र संताप.
दिगंबर देशभ्रतार
"साप्ताहिक जनता की आवाज"
तुमसर :- केंद्र सरकारद्वारे रेल्वे स्थानकांच्या आधुनिकी करणासाठी 'अमृत भारत' योजनेचा गाजावाजा केला जात असला, तरी तुमसर रोड रेल्वे स्थानकावरील प्लॅटफॉर्म क्रमांक ४ ची दुर्दैवी स्थिती रेल्वे प्रशासनाच्या दाव्यांना थेट आव्हान देत आहे. पावसाळ्याच्या दिवसांत छताविना (शेड) प्रवाशांना उघड्यावर भिजावे लागत असल्याने रेल्वे प्रवाशांमध्ये मोठा संताप व्यक्त केला जात आहे.
तुमसर रोड स्थानकावरील प्लॅटफॉर्म क्रमांक ४ हा अत्यंत वर्दळीचा प्लॅटफॉर्म.
आहे. बालाघाट-इतवारी, तिरोडी इतवारी, दुर्ग-इतवारी, डोंगरगड-इतवारी
आण्णाच्या इतवारी गाड्यांसारख्या प्लॅटफॉर्मवरून सुटतात. याव्यतिरिक्त, मुख्य मार्गावरील अनेक एक्स्प्रेस गाड्यांना 'क्रॉसिंग' देण्यासाठी याच प्लॅटफॉर्मचा वापर केला जातो. दिवसाला हजारो प्रवाशांची ये-जा असतानाही, मूलभूत सुविधांच्या अभावामुळे प्रशासनाचे नियोजन कागदावरच असल्याचे दिसून येत आहे.
गोंदिया टोकाला शेड, नागपूर टोक वाऱ्यावर..
प्लॅटफॉर्मच्या स्थितीबाबत बोलताना प्रवाशांनी सांगितले की, येथे केवळ गोंदिया टोकाच्या बाजूला एकच शेड आहे. मात्र, नागपूर टोकाकडे दूरपर्यंत एकही शेड नसल्याने प्रवाशांना भर पावसात गाडीची
प्रतीक्षा करावी लागते. मुसळधार पावसान रुग्णांची होणारी दैना अत्यंत वेदनादायी आहे. भिजलेल्या प्लॅटफॉर्मवर घसरून अपघाताचा धोकाही ओढवला आहे.
रेल्वे प्रशासनाकडून प्रवाशांकडून तिकीटाचे पूर्ण भाडे वसूल केले जाते, मग सुविधा देण्यात आखडता हात का? असा संतप्त सवाल प्रवाशांकडून उपस्थित केला जात आहे. 'एखादी मोठी दुर्घटना घडल्यानंतरच प्रशासन जागे होणार का?' असा प्रश्न नागरिक विचारत आहेत.
अमृत भारत योजनेअंतर्गत आधुनिकीकरणाची स्वप्ने दाखवणाऱ्या रेल्वे प्रशासनाने तात्काळ या प्लॅटफॉर्मवर शेड उभारून प्रवाशांना दिलासा द्यावा, अशी मागणी जोर धरत आहे.
0 Response to "तुमसर रोड रेल्वे स्थानकाचे 'अमृत' नाव, पण प्रवाशांचे हाल!.."
एक टिप्पणी भेजें