-->
अमरावती आय टी आय चे शिल्पनिदेशक विनायक कांडलकर यांचे निधन.

अमरावती आय टी आय चे शिल्पनिदेशक विनायक कांडलकर यांचे निधन.



अविनाश गोंडाणे 
"साप्ताहिक जनता की आवाज"  

अमरावती (वि.प्रति.) :- संत गाडगेबाबा शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, अमरावती येथे आरेखक (यांत्रिकी) निदेशक म्हणून कार्यरत असलेले विनायक आनंदराव कांडलकर (वय ५७, रा. गुरुकुंज मोझरी) यांचे निधन झाले.

ते संस्थेच्या आवारातील शासकीय निवासस्थानी वास्तव्यास होते. तेथेच त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनामुळे औद्योगिक प्रशिक्षण क्षेत्रासह सामाजिक क्षेत्रातही हळहळ व्यक्त होत आहे.

स्व. कांडलकर हे सत्यशोधक चळवळीतील सक्रिय कार्यकर्ते म्हणून परिचित होते. ते निर्भीड, स्पष्टवक्ते आणि परखड विचार मांडणारे प्रभावी वक्ते होते. सामाजिक प्रश्नांवर त्यांनी नेहमीच निःस्वार्थपणे आणि निडरपणे भूमिका मांडली. त्यांच्या अभ्यासू वृत्ती, सामाजिक बांधिलकी आणि प्रामाणिक कार्यशैलीमुळे त्यांना सहकारी, विद्यार्थी, सामाजिक कार्यकर्ते आणि मित्रपरिवारात विशेष मानाचे स्थान प्राप्त झाले होते.
त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली तसेच आप्तस्वकीय असा परिवार आहे.

त्यांच्यावर सोमवार, दि. १३ जुलै २०२६ रोजी दुपारी ३.०० वाजता राहत्या घरून अंत्ययात्रा निघून गुरुकुंज मोझरी येथील हिंदू स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
स्व. विनायक कांडलकर यांच्या निधनाने एक कर्तव्यदक्ष शासकीय कर्मचारी, सामाजिक जाण असलेला सत्यशोधक कार्यकर्ता आणि परखड विचारांचा निर्भीड वक्ता हरपल्याची भावना सर्व स्तरांतून व्यक्त होत आहे.

0 Response to "अमरावती आय टी आय चे शिल्पनिदेशक विनायक कांडलकर यांचे निधन."

एक टिप्पणी भेजें

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article