स्वीकृत सदस्य निवडणूक आज; २ जागांसाठी ६ इच्छुक रिंगणात.
बुधवार, 15 जुलाई 2026
Comment
दिगंबर देशभ्रतार
"साप्ताहिक जनता की आवाज"
तुमसर :- मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर रिक्त झालेल्या तुमसर नगरपरिषदेतील दोन स्वीकृत सदस्यपदांसाठी आज (१५ जुलै) मतदान होत असून, या निवडणुकीकडे संपूर्ण शहरासह राजकीय वतुळंचे लक्ष लागले आहे. दोन जागांसाठी तब्बल सहा इच्छुकांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्याने चुरशीची लढत रंगण्याची चिन्हे आहेत. त्यातच ऐन निवडणुकीच्या तोंडावर नगराध्यक्ष इंजि. सागर गभने यांची प्रकृती बिघडल्याने या निवडणुकीभोवती उत्कंठा आणखी वाढली आहे.
मुंबई उच्च न्यायालयाने यापूर्वी दोन स्वीकृत..
सदस्यांची नियुक्ती रद्द करत तीन आठवड्यांच्या आत कायदेशीर व पारदर्शक पद्धतीने नव्याने निवड प्रक्रिया पूर्ण करण्याचे निर्देश दिले होते. त्या आदेशानुसार नगरपरिषद प्रशासनाने तातडीने निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला. मंगळवारी दुपारी २.५० वाजेपर्यंत नामनिर्देशन अर्ज स्वीकारण्यात डआले असून, अजांची छाननी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर अंतिम उमेदवारांचे चित्र स्पष्ट होणार आहे. प्राथमिक माहितीनुसार, दोन जागांसाठी भाजपा समर्थित गटाकडून चार, तर अन्य दोन गटांकडून प्रत्येकी एक उमेदवार मैदानात उतरला आहे. त्यामुळे या निवडणुकीत राजकीय चुरस कमालीची वाढली आहे.
0 Response to "स्वीकृत सदस्य निवडणूक आज; २ जागांसाठी ६ इच्छुक रिंगणात."
एक टिप्पणी भेजें