भिवापूर तालुक्यातील पुल्लर ते डोंगरमौदा रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था.
रविवार, 12 जुलाई 2026
Comment
• रस्त्यात खड्डा की खड्ड्यात रस्ता.
संजीव भांबोरे
"साप्ताहिक जनता की आवाज"
नागपूर :- भिवापूर तालुक्यातील १२ किलोमीटर अंतरावर असलेले गाव म्हणजे पुल्लर होय. पुल्लर पासून डोंगरमौदा ५ किलोमीटर अंतरावर आहे. परंतु रस्ता अत्यंत जीवघेण्या दुर्लभ, हृदयद्रावक विचित्र आहे. अशातच टू व्हीलर प्रवासी तसेच फोर व्हीलर प्रवासी यांना प्रवास वा यातायात करण्यास हानिकारक आहे. कुणाच्या जीवाची कुणाला नाही रे दया मतलबाची आहे आता सारी दुनिया! अपघात कुणी नेले काय आणि कुणी पेटलं काय याची कुणाला काही परवा नाही ?अशात एखाद्या गाडीचा टायर फुटला किंवा पेटल्यास कुणाला काही देणंघेणं नाही. या रस्त्याने जनावरांचा उपद्रव भरपूर असतो मग यातायात प्रवास करणाऱ्या नागरिकांनी आपला प्रवास कसा करावा ? जिल्हा प्रशासन व लोकप्रतिनिधी यांनी या रस्त्याचे गांभीर्य लक्षात घेऊन घेऊन दुरुस्तीकरणास सहयोग देऊन हा खराब रस्ता लवकरात लवकर काँक्रीटिंग कसा लवकर तयार होईल अशी मागणी ओबीसी सेवा संघ नागपूर जिल्हा अध्यक्ष नारायण उदापुरे व परिसरातील जनतेने केलेली आहे.
0 Response to "भिवापूर तालुक्यातील पुल्लर ते डोंगरमौदा रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था. "
एक टिप्पणी भेजें