-->
डॉ.गायत्री अनिल कुमार रामटेके यांचा विश्वरत्न बोधिसत्व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या चंद्रपूर येथील दीक्षाभूमीवर भव्य सत्कार करण्यात आला.

डॉ.गायत्री अनिल कुमार रामटेके यांचा विश्वरत्न बोधिसत्व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या चंद्रपूर येथील दीक्षाभूमीवर भव्य सत्कार करण्यात आला.



       प्रदीप कडबे (वि.प्र.)
"साप्ताहिक जनता की आवाज  

चंद्रपूर :- बोधिसत्व विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी चंद्रपूरच्या ज्या दीक्षाभूमीवर दोन लाख बांधवांना धम्मदीक्षा दिली,त्या दीक्षाभूमीवर दिनांक दहा जुलै रोजी डॉ.बाबासाहेब आंबेडकर शैक्षणिक सहाय्यक संस्था चंद्रपूर च्या वतीने डॉ.गायत्री रामटेके यांचा भव्य सत्कार करण्यात आला.डॉ.गायत्री रामटेके यांनी आपल्या एक पात्री प्रयोगाच्या माध्यमातून महाराष्ट्र नव्हे तर महाराष्ट्राबाहेर आपल्या कलेच्या माध्यमातून महामानवांचे कार्य घराघरात पोहोचविले त्याचप्रमाणे इतर सामाजिक कार्यात त्यांनी उल्लेखनीय कार्य केलेले आहे.त्यांच्या कार्याची दखल घेऊन डॉ.बाबासाहेब आंबेडकर शैक्षणिक सहाय्यक संस्थेचे अध्यक्ष तसेच संविधान जागर उपक्रमाचे मुख्य प्रवर्तक आदरणीय घोटेकर साहेब यांनी सन्मानचिन्ह पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार केला.
त्याचप्रमाणे जे गुणवंत विद्यार्थी आहेत त्यांचा देखील सत्कार करण्यात आला.
त्यावेळी गायत्री ताई रामटेके यांनी संविधाना जागर किती महत्त्वाचा आहे आणि ते घराघरापर्यंत कसे पोहोचविले जाईल याबद्दल मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष आद.अशोक घोटेकर 
उद्घाटक आद. तुषार पगारे प्रमुख 
मार्गदर्शक आद.आयुष नोपाणी आद .सुधीर इंगळे इंजिनिअर शेषराव सहारे डॉ.गायत्री रामटेके हे होते
या कार्यक्रमाला बहुसंख्येने विद्यार्थी वर्ग उपस्थित होता त्याचप्रमाणे भारतीय बौद्ध महासभेचे अध्यक्ष आद किशोर तेलतुंबडे सर, आद संदीप सोनवणे सरचिटणीस ,आद गुरु बालक मेश्राम, कोषाध्यक्ष आयुनी सुजाता लाटकर ,आयुनी पंचशीला वेले,आयुनी मिलीताई वाघ,अनुकला ताई वाघमारे,आयुनी सविता रामटेके,आयुनि छाया काळे ,सुनीता कांबळे इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते

0 Response to "डॉ.गायत्री अनिल कुमार रामटेके यांचा विश्वरत्न बोधिसत्व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या चंद्रपूर येथील दीक्षाभूमीवर भव्य सत्कार करण्यात आला."

एक टिप्पणी भेजें

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article