-->
15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने विद्यार्थ्यांसाठी विशेष मार्गदर्शन व प्रशिक्षण सत्र.

15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने विद्यार्थ्यांसाठी विशेष मार्गदर्शन व प्रशिक्षण सत्र.



साप्ताहिक जनता की आवाज"
 वृत्तपत्र प्रतिनिधी 

मुबंई :- ‘हर घर तिरंगा – स्वच्छ भारत अभियान’ अंतर्गत संविधान व पर्यावरण सुरक्षा या विषयावर विशेष मार्गदर्शन व प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन Holy Angels High School, Malvani, Mumbai येथे करण्यात आले होते 
हा उपक्रम आंतरराष्ट्रीय मानवाधिकार असोसिएट्सचे संस्थापक अध्यक्ष ॲड. विक्रांत वाघचौरे साहेब व राष्ट्रीय अध्यक्ष श्री. भरत चवरे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आला.

सदर उपक्रमास मा तहसीलदार साहेब बोरिवली मुंबई यांनी माहिती घेऊन. शुभेच्छा दिल्या,
या कार्यक्रमास Holy Angels High School चे प्रिन्सिपल सिम्पसेन सर, राष्ट्रवादी काँग्रेस महिला सेल च्या मालाड तालुका अध्यक्ष सौ.भारती ताई जाधव, शाळेतील सर्व प्राध्यापकवृंद,कर्मचारी, शिक्षक, सर्व विद्यार्थी तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी विद्यार्थ्यांना भारतीय संविधानातील मूलभूत मूल्ये, नागरिकांची कर्तव्ये, पर्यावरण संरक्षण व सुरक्षा, प्लास्टिकमुक्ती, कचरा व्यवस्थापन आणि स्वच्छतेचे महत्त्व याबाबत मार्गदर्शन व प्रशिक्षण देण्यात आले.

विद्यार्थी, शिक्षक व नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत पर्यावरण संरक्षण, संविधानाचा सन्मान आणि जबाबदार नागरिकत्वाचा संकल्प केला.

0 Response to "15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने विद्यार्थ्यांसाठी विशेष मार्गदर्शन व प्रशिक्षण सत्र."

एक टिप्पणी भेजें

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article