स्वातंत्र्य दिन सोहळ्यात गुणवंतांचा सत्कार.
सोमवार, 17 अगस्त 2026
Comment
प्रदिप कडबे
"साप्ताहिक जनता की आवाज"
नागपूर :- 'सम्राट अशोक विद्यालय, निहारवानी' ता. मौदा, जि. नागपूर येथे पार पडलेल्या स्वातंत्र्य दिन सोहळ्यात, स्वामी विवेकानंद सार्वजनिक वाचनालयाच्या वतीने विद्यालयातील गुणवंत विद्यार्थ्यांचा स्मृतीचिन्ह, प्रशस्तीपत्र, ग्रंथ भेट देऊन सत्कार करण्यात आला.
या मध्ये इयत्ता 10 वीत प्रथम-कु. श्रावणी शेंडे, द्वितीय-कु. कावेरी दारवाटे, तृतीय-रितिक मेश्राम तसेच शिष्यवृत्ती परीक्षा पात्र विद्यार्थी आर्या मानकर, भावेश लांजेवार, अन्वेश गिर्हेपुंजे, विरेन गिर्हेपुंजे, यांचा समावेश होता. -
-या प्रसंगी ध्वजारोहक-विलास बान्ते, अध्यक्ष रविंद्र चरडे (सरपंच), प्रमुख अतिथी मोरेश्वर चरडे, मुख्याध्यापिका चेटूले मॅडम, टिळक दंढारे वाचनालयाचे अध्यक्ष - कंठिराम दंढारे, मुनालाल चोपकर, पोलिस पाटील मानकर व ग्राम पंचायत सदस्य गण तसेच गावातील प्रतीष्ठीत नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे संचालन मुकेश रामटेके (शिक्षक) यांनी केले तसेच आभार विलास दंढारे यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्याकरीता विनोद नागदेवे, कारेमोरे, जाधव, विनोद आकरे, किरण खोब्रागडे, प्रतिक्षा ढोबळे, यांनी परिश्रम घेतले.
0 Response to "स्वातंत्र्य दिन सोहळ्यात गुणवंतांचा सत्कार."
एक टिप्पणी भेजें