शुद्धीकरण करणाऱ्या वर ऍट्रॉसिटी अंतर्गत कारवाई करा संविधान बाचाओ संघर्ष समितीची मागणी.
शुक्रवार, 14 अगस्त 2026
Comment
"साप्ताहिक जनता की आवाज"
वृत्तपत्र प्रतिनिधी
भंडारा :- दि. 14 ऑगस्ट 2026
काँग्रेस चे राष्ट्रीय अध्यक्ष मा. मल्लिकार्जुन खरगे यांच्या आसनाचे हिंदुत्ववादी धार्मिक संघटनेच्या लोकांनी गंगाजल शिंपडून, हवन करून, मंचाचे शुद्धीकरण केले या कृत्यामुळे मा. मल्लिकार्जुन खरगे यांचेच नव्हे तर संपूर्ण मागासवर्गीय समाजाचा सार्वजनिक रित्या अवमान केल्याप्रकरणी संबंधीतांवर ऍट्रॉसिटी कायद्या अंतर्गत कारवाई करावी यासंबंधी चे निवेदन संविधान बचाओ संघर्ष समिती भंडारा तर्फे भारताच्या राष्ट्रपती महामहीम मा. द्रौपदी मुर्मू यांना मा. जिल्हाधिकारी भंडारा यांचे मार्फत देण्यात आले.
काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष व राज्यसभेचे जेष्ठ खासदार श्री. मल्लिकार्जुन खरगे यांनी 8ऑगस्ट 2026 ला उत्तराखंड मधील हलद्वानी च्या रामलीला मैदानावर जाहीर सभा घेतली होती. सभेनंतर स्थानिक धार्मिक संघटना व श्रीराम सेना चारिटेबल ट्रस्ट च्या कार्यकर्त्यांनी गंगाजल शिंपडत हवन केले आणि संपूर्ण मंच च शुद्ध करून घेतला. असे कृत्य करून त्यांनी श्री. खरगे यांचाच अवमान केला नाही तर देशातील सर्व मागासवर्गीय समुदायाचा सार्वजनिक अपमान केला आहे.
संविधानाने अस्पृशता संपवून सुद्धा आजही देशात दलित आदिवासी यांचा जाहीर रित्या अपमान करण्याचे प्रकार वाढत आहेत ही अत्यंत निंदनीय बाब असून देशाच्या राष्ट्रीय एकात्मतेला धोका निर्माण करण्याचा प्रयत्न आहे.
देशातील दलित आदिवासी वरील अन्यायाची नैतिक जवाबदारी स्वीकारून प्रधानमंत्र्यांनी उदया स्वातंत्र्य दिनी लाल किल्ल्या वरून जाहीर माफी मागावी तसेच अश्या प्रकारचे कारनामे करणाऱ्यांनावर अनु. जाती जमाती अत्याचार प्रतिबंध कायद्यानुसार कठोर कारवाई करावी अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.
निवेदन देतांना समिती चे अध्यक्ष रोशन जांभुळकर, संयोजक सदानंद इलमे, कार्याध्यक्ष चंद्रशेखर टेम्भूरणे, सचिव असित बागडे, अमृत बन्सोड, ग्यानचंद जांभुळकर, भगीरथ धोटे, राजेश मडामे, रवींद्र जंबंधू, नितेश गाणार, किशोर डोकरिमारे, अजाबराव चिचामे, श्रीकृष्ण पडोळे,प्रभाकर वैरागडे, सुरेशदादा खंगार, हंसराज वैद्य, प्रलय सुखदेवे, मनीषा भांडारकर, पूजा पाटील, देवानंद वालदेकर आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
0 Response to "शुद्धीकरण करणाऱ्या वर ऍट्रॉसिटी अंतर्गत कारवाई करा संविधान बाचाओ संघर्ष समितीची मागणी."
एक टिप्पणी भेजें