खोकरला येथे जडीबुटी दिन साजरा.
मंगलवार, 4 अगस्त 2026
Comment
संजीव भांबोरे
"साप्ताहिक जनता की आवाज"
भंडारा :- पतंजली योग समिती खोकरला व ग्राम पंचायत कार्यालय खोकरला च्या वतीने नित्य योग वर्ग खोकरला येथे आचार्य बालकृष्ण महाराज यांच्या जन्मदिन तथा जडीबुटी दिनानिमित्त जडीबुटी वितरण व परिसरात वृक्षारोपण कार्यक्रम मंगळवार दिनांक ४ ऑगस्टला मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वरिष्ठ योग शिक्षक मारोती पुडके होते. प्रमुख पाहुणे म्हणून महादेव चांदेवार, ग्राम पंचायत सदस्य सुरेश घोडे, योग शिक्षक दिलीप वालदे, योग शिक्षक तथा सामाजिक कार्यकर्ता विलास केजरकर, छाया मेश्राम, शालिनी बैस, ग्राम पंचायत अधिकारी एस. आर. निमजे, महामंत्री यशवंत बिरे, योग शिक्षिका अंजली बोरकर इत्यादी मान्यवर उपस्थित होते. पाहुण्याच्या हस्ते व्दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले.
कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांनी जडीबुटी' दिन व आचार्य बालकृष्ण महाराज यांच्या जन्मदिना निमित्त जडीबुटी वितरण करून परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. तसेच जडीबुटी' दिन व आचार्य बालकृष्ण महाराज यांच्या जन्मदिना निमित्त सविस्तर मार्गदर्शन केले.
त्यावेळी वृक्षगीत, वृक्षसंवर्धन प्रार्थना,
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन व प्रास्ताविक रमेश बुरबादे यांनी केले तर उपस्थितांचे आभार प्यारेलाल शहारे यांनी मानले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता तेजराम बहेकार, दामोधर बोदेले, गणेश उपासे, बाबुराव दमाहे, बंडू बेहरे, महादेव वंजारी, गीता आगासे, प्रमिला बुरबादे, मंदा चावरे, मार्तंड गायधने, रजनी कुकडकर, वंदना धांडे, जयश्री दुधकवार, समरित, भाऊराव आगाशे, कल्पना गराडे, शामराव गौरी, रामलाल शेंडे, राधा डोर्लीकर, माधवी नंदनवार, शालीनी बैस, वैशाली घोडे, ज्योती सूर्यवंशी, पल्लवी राऊत, ओमकांता भोंदे, श्रध्दा पांडे, भाऊराव आगाशे, लक्ष्मीनारायण भिवगडे, बाबुलाल बिसेन, श्रीकृष्ण जिभकाटे, खेमचंद रोटके, केशव खोटेले, मिना रोकडे, तसेच पतंजली योग समिती खोकरलाच्या महीला -पुरूष योग साधकांनी सहकार्य केले.
0 Response to "खोकरला येथे जडीबुटी दिन साजरा. "
एक टिप्पणी भेजें