-->
तुमसर तालुक्यात 'स्मार्ट मीटर' च्या बिलामुळे गोंधळ !..

तुमसर तालुक्यात 'स्मार्ट मीटर' च्या बिलामुळे गोंधळ !..


• तुमसर तालुक्यात 'स्मार्ट मीटर' लावले असता अव्वा च्या सव्वा.विघुत विल येत असल्यामुळें नागरिकात संतापाची लाट..
.                      न्युज स्मार्ट मिटर 

         दिगंबर देशभ्रतार 
"साप्ताहिक जनता की आवाज" 

तुमसर :- ४ ऑगस्ट विज वितरण कंपनीतर्फे लावण्यात आलेल्या स्मार्ट मिटरने अधिक वीज बिल येत असल्याची ओरड नागरीकांमध्ये असुन त्यामुळे महावितरण विरुद्ध जनतेत रोष असल्याचे चित्र दिसून येत आहेत.

तालुक्यात स्मार्ट मीटर मुळे अधिक वीज बिल येत असल्याची ओरड नागरीकांमध्ये सुरु आहे. मागील वीज मिटर पेक्षा नवीन वीज स्मार्ट मिटर ने अधिक वीज बिल येत असल्याचे, ग्राहकात बोलले जात आहे. त्यामुळे ग्राहक जनतेत संताप व्यक्त केले जात आहे. व वीज बिल कमी करण्या साठी. जनता महावित-रण कार्यालयाचे चकरा मारतांना दिसून येत आहेत. मात्र महावितरणकडुन देण्यात येणाऱ्या उत्तरामुळे जनतेचे समाधान होत नसल्याने ग्राहकांमध्ये महावितरण प्रशासना विरुद्ध अधिक रोष दिसून येत आहे. महावितरण प्रशासनाने ग्राहक जनतेची लुट सुरु केली आहे का? असा प्रश्न जनतेत उपस्थित केले जात आहे.

करिता महावितरण कार्यालयात ग्राहक जन-तेच्या समस्याचे निराकरण करून देत. आर्थिक लुट थांबविण्याची मागणी तालुक्यातील जनता करित आहेत.

0 Response to "तुमसर तालुक्यात 'स्मार्ट मीटर' च्या बिलामुळे गोंधळ !.."

एक टिप्पणी भेजें

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article