डॉ.शाम जाधव यांना राज्यस्तरीय संत ज्ञानेश्वर माऊली साहित्य पुरस्कार सन्मानित.
मंगलवार, 25 अगस्त 2026
Comment
प्रदीप कडबे
"साप्ताहिक जनता की आवाज"
नागपुर/आळंदी (नागपूर वि.प्रति.) :- द्वारा के. एस. आय. पब्लिकेशन, कोल्हापूर यांच्या वतीने दि.२३ ऑगस्ट २०२६ रोजी, संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पावन नगरीत, आळंदी येथे इंद्रायणीच्या पवित्र नदीकाठी ३० वे राज्यस्तरीय साहित्य संमेलन व पुरस्कार सोहळा डॉ. शाम जाधव (ज्येष्ठ पत्रकार) यांना संत ज्ञानेश्वर साहित्य प्रेरणा पुरस्कार सन्मानित
सुप्रसिद्ध अभिनेत्री चित्रा दीक्षित यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आला.
या कार्यक्रमाच्या क्षणी सुनीता क्षीरसागर ,अँकर कवी इंगळी, संमेलनाचे अध्यक्ष दशरथ बाबासाहेब धायगुडे सातारा, उद्घाटक कवी दीपक पवार, स्वागत अध्यक्ष सी.ए.डॉ. घनश्याम अदानी, पुणे प्रमुख मार्गदर्शक श्री श्रीकांत श्रीपाद पाटील कोल्हापूर, अत्यंत दिमाखदार, सुसंस्कृत, सुरेल आणि आनंददायी वातावरणात संपन्न झाला.
या भव्य साहित्य सोहळ्यास महाराष्ट्राच्या विविध जिल्ह्यांतून मोठ्या संख्येने साहित्यिक, कवी, लेखक आणि रसिकांची उत्स्फूर्त उपस्थिती लाभली. संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन, आयोजन आणि अंमलबजावणी अतिशय सुंदर, शिस्तबद्ध आणि सुसंस्कृत पद्धतीने करण्यात आली.
विशेष कौतुकाची आणि अभिमानाची बाब म्हणजे काळ्या मातीत जगलेला, इयत्ता चौथीपर्यंत शिक्षण घेतलेला एक सामान्य माणूस आपल्या कर्तृत्वाने साहित्याच्या क्षेत्रात असंख्य प्रतिभावंतांना व्यासपीठ उपलब्ध करून देतो, ही बाब निश्चितच प्रेरणादायी आणि कौतुकास्पद आहे.
स्वतःच्या संघर्षातून उभे राहत असताना इतरांच्या कलागुणांना वाव देणे, नवोदित साहित्यिकांना प्रोत्साहन देणे आणि महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमधील कवी, लेखक व साहित्यिकांना आपली कला आणि साहित्य सादर करण्यासाठी एक भक्कम व्यासपीठ उपलब्ध करून देणे, हे विलास पाटील सरांचे साहित्यविश्वातील अनमोल योगदान आहे.
अशा साहित्यिक चळवळीमुळे अनेक सुप्त प्रतिभांना ओळख मिळते, त्यांच्या लेखणीला बळ मिळते, योग्य व्यासपीठ मिळते आणि मराठी साहित्याची समृद्ध परंपरा अधिक व्यापक होत जाते.
आदरणीय विलास पाटील सर ‘कवी सरकार इंगळी’, आपल्या या अविरत साहित्यसेवेसाठी, साहित्यिकांना दिलेल्या या सुंदर व्यासपीठासाठी आणि महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील प्रतिभावंतांना एका धाग्यात बांधण्यासाठी आपल्या माध्यमातून असंख्य नवोदित कवी, लेखक आणि साहित्यिकांना नवी दिशा, नवी ओळख आणि नवे व्यासपीठ मिळत राहो, हीच मनःपूर्वक सदिच्छा!
इंद्रायणीच्या पावन काठी घडलेला हा साहित्यिक सोहळा सदैव स्मरणात राहील,असा एतिहासिक ठरला.
0 Response to "डॉ.शाम जाधव यांना राज्यस्तरीय संत ज्ञानेश्वर माऊली साहित्य पुरस्कार सन्मानित."
एक टिप्पणी भेजें