-->
शाळा परिसरात सिमेंट रस्त्यावर टाकला मुरूम..

शाळा परिसरात सिमेंट रस्त्यावर टाकला मुरूम..

 

• तुमसर नगर परिषदेचा भोंगळ कारभार; विद्यार्थ्यांची मोठी गैरसोय.

"साप्ताहिक जनता की आवाज"
 वृत्तपत्र प्रतिनिधी 

तुमसर :- दि २३ ला माकडे नगर, तुमसर येथील नगर परिषदेच्या रामजी गणेशा प्राथमिक शाळा परिसरात सिमेंट रस्त्यावर तब्बल १० ते १५ ट्रॅक्टर मुरूम टाकण्यात आला. नगर परिषदेने ऐन पावसाळ्यात घेतलेल्या या अजब निर्णयामुळे संपूर्ण रस्त्यावर चिखलच चिखल निर्माण झाले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांची मोठी गैरसोय होत आहे.

शाळेत जाणाऱ्या ज्या रस्त्यावर मुरूम टाकण्यात आला, तो आधीपासूनच सिमेंटरीकरणाचा रस्ता होता. सदर सिमेंट रस्त्यावरच मुरूम ओतण्याचा अजब प्रकार येथे घडला आहे. पावसाळ्यात सिमेंट रस्त्यावरील मुरमाचा संपूर्ण चिखल झाल्याने मुलांचे पाय घसरून पडण्याचे आणि कपडे खराब होण्याचे प्रमाण वाढले आहे. नगर परिषद प्रशासनाने ऐन पावसाळ्यात मुरूम टाकल्याने काय परिस्थिती निर्माण होईल, याची साधी शंकाही न बाळगल्याने नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे.

दरम्यान, विद्यार्थ्यांच्या सुरक्षेशी आणि शिक्षणाशी खेळणाऱ्या या प्रकाराची नगर परिषद
 प्रशासनाने तातडीने गंभीर दखल घ्यावी. सिमेंट रस्त्यावरील चिखल तत्काळ हटवून तो मुरूम पटांगणाच्या योग्य जागेवर पसरवण्यात यावा, संबंधित कंत्राटदारावर कारवाई करण्यात यावी.

पटांगणाची गरज सोडून भलतीकडेच काम...

शाळेची जुनी इमारत पाडल्यानंतर त्या मोकळ्या जागेत मुलांच्या खेळाच्या पटांगणासाठी खरोखरच मुरमाची गरज होती. मात्र, तिथे मुरूम न पसरवता कंत्राटदाराने सिमेंट रस्त्यावरच मुरूम टाकून केवळ आपले बिल उकळण्यासाठी थातूरमातूर काम उरकून आपली 'पोळी भाजून' घेतल्याचा आरोप विद्यार्थ्यांच्या पालकांनी केला आहे.
अशी मागणी माकडे नगरातील रहिवाशांनी केली आहे.

"मुरूम टाकल्याच्या ठिकाणाची मोका चौकशी करून उचित कार्यवाही केली जाईल"

        शांतनू रसाटे,
बांधकाम अभियंता (शहर)
 नगर परिषद, तुमसर.

"शाळेच्या मोकळ्या पटांगणात मुरमाची खरी गरज असताना तिथे न टाकता कंत्राटदाराने सिमेंट रस्त्यावर मुरूम टाकला. नगर परिषदेने संबंधित कंत्राटदारावर तत्काळ कारवाई करावी, रस्त्यावरील चिखल हटवून तो मुरूम पटांगणात पसरवून विद्यार्थ्यांची गैरसोय दूर करावी."

        संदीप लांजेवार,
रहिवासी, माकडे नगर, तुमसर.

0 Response to "शाळा परिसरात सिमेंट रस्त्यावर टाकला मुरूम.."

एक टिप्पणी भेजें

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article