-->
डॉ.अक्षय कहालकर राज्यस्तरीय "उत्कृष्ट निसर्गोपचार तज्ज्ञ" पुरस्काराने सन्मानित.

डॉ.अक्षय कहालकर राज्यस्तरीय "उत्कृष्ट निसर्गोपचार तज्ज्ञ" पुरस्काराने सन्मानित.




• कॅबिनेट मंत्री अतुल सावे यांचे हस्ते छ. संभाजीनगर येथे सत्कार

संजीव भांबोरे 
"साप्ताहिक जनता की आवाज"

भंडारा :- दि. 23 ऑगस्ट 2026 ला बी.एस.पी. मेडिकल कॉलेज छत्रपती संभाजीनगर येथे महाराष्ट्र निसर्गोपचार ऑर्गनायझेशन महाराष्ट्र राज्य आयोजित राज्यस्तरीय "उत्कृष्ट निसर्गोपचार तज्ज्ञ" पुरस्कार 2026 हा भंडारा येथील डॉ.अक्षय कहालकर यांना कॅबिनेट मंत्री अतुल सावे यांचे हस्ते सत्कार करून प्रदान करण्यात आला. 

डॉ.अक्षय कहालकर हे बर्‍याच वर्षांपासून आरोग्य क्षेत्रात समाजाची सेवा करत आहेत. आजपर्यंत महाराष्ट्र व महाराष्ट्राबाहेरील हजारो रूग्णांना नवी संजीवनी देवून दुःखातून दूर केले आहे. अनेक रूग्णांना मणक्याच्या ऑपरेशन पासून वाचवलेले असून अतिशय माफक दरात रूग्ण सेवा देत असतात.

महाराष्ट्र निसर्गोपचार ऑर्गनायझेशन महाराष्ट्र राज्य यांचे तर्फे राज्यस्तरीय निसर्गोपचार सेमिनार व प्राकृतिक चिकित्सा पद्धतीने उपचार करून समाजाची सेवा करणारे वैद्य तसेच ह्या क्षेत्रात शिक्षण घेणारे विद्यार्थी यांची कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती त्यात महाराष्ट्र राज्यातील वेगवेगळ्या जिल्ह्यातून निसर्गोपचार डॉक्टर, विद्यार्थी, शिक्षक, अभ्यासक उपस्थित होते.

महाराष्ट्र राज्यात प्राकृतिक चिकीत्सेत 2025- 2026 ह्या वर्षात उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल डॉ.अक्षय कहालकर यांना कॅबिनेट मंत्री अतुल सावे यांचे हस्ते सन्मानचिन्ह, मेडल व सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले.

यावेळी उपस्थित कॅबिनेट मंत्री अतुल सावे, शिवा ट्रस्टचे अध्यक्ष बाळासाहेब पवार, शंतनू पवार, एम.एन.ओ. चे अध्यक्ष साईदीप रोट्टे, डॉ. संजय कडू, डॉ. प्रभाकर साळवे, वैद्यकीय अधिकारी डाॅ. देशमुख व मान्यवर उपस्थित होते.

0 Response to "डॉ.अक्षय कहालकर राज्यस्तरीय "उत्कृष्ट निसर्गोपचार तज्ज्ञ" पुरस्काराने सन्मानित."

एक टिप्पणी भेजें

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article