सहा वर्षांपासून रखडला बोथलीचा रस्ता, स्मशान आणि शेताचा मार्ग बंद.
शनिवार, 22 अगस्त 2026
Comment
प्रशासनाने लक्ष देण्याची गरज- सामाजिक कार्यकर्ते बालू वैद्य यांची मागणी.
संजू भांबोरे
"साप्ताहिक जनता की आवाज"
भंडारा :- मोहाडी तालुक्यातील बोथली येथील स्मशानभूमीकडे जाणारा सिमेंट रस्ता तब्बल सहा वर्षांपूर्वी पुराच्या पाण्यात वाहून गेला. मात्र आजपर्यंत प्रशासनाने त्याकडे दुर्लक्ष केल्याने गावकऱ्यांना प्रचंड अडचणींचा सामना करावा लागत आहे.
हाच रस्ता इंदूरखा गावाला जोडणारा आणि बोथलीतील शेतकऱ्यांसाठी शेतावर जाण्याचा मुख्य मार्ग आहे. रस्ता वाहून गेल्यापासून नागरिकांचा संपर्क तुटला आहे. सध्या स्मशानभूमीपर्यंत जाण्यासाठी गावकऱ्यांनी स्वतः पायवाट तयार केली आहे. परंतु पावसाळ्यात नदीला पूर आल्यास ही पायवाटही पाण्याखाली जाते. त्यामुळे मृतदेह अंत्यसंस्कारासाठी नेणे अवघड झाले आहे.
शेतावर जाणाऱ्या शेतकऱ्यांना, शाळकरी मुलांना, महिला आणि ज्येष्ठ नागरिकांना रोजच्या ये-जासाठी मोठी पायपीट करावी लागत आहे. पावसाळ्यात तर परिस्थिती आणखी बिकट होते. नदीला मोठा पूर आल्यास हे पाणी थेट भविष्यात भंडारा-तुमसर या प्रमुख राज्य महामार्गावर येऊन वाहतूक बंद होऊ शकते. त्यामुळे केवळ बोथलीच नव्हे तर परिसरातील गावांचाही संपर्क तुटण्याचा धोका आहे.
. परंतु अद्याप रस्त्याच्या दुरुस्तीसाठी कोणतेही ठोस पाऊल उचलले गेले नाही. त्यामुळे नागरिकांमध्ये प्रशासनाविषयी नाराजी आहे.
"हा रस्ता बोथलीकरांसाठी जीवनावश्यक आहे. शासनाने तातडीने येथे दगडाची टीचिंग किव्वा नदी काठ लगत मोठी पार करून पूरप्रतिकारक मजबूत सिमेंट रस्ता बांधावा. अन्यथा पुढे मोठी दुर्घटना घडू शकते."
कायमस्वरूपी आणि दर्जेदार रस्ता व्हावा अशी बोथलीकरांची मागणी आहे. प्रशासनाने याकडे तातडीने लक्ष देऊन रस्त्याचे काम मार्गी लावावे अशी अपेक्षा व्यक्त सामाजिक कार्यकर्ते बालू वैद्य यांनी केली आहे .
0 Response to "सहा वर्षांपासून रखडला बोथलीचा रस्ता, स्मशान आणि शेताचा मार्ग बंद."
एक टिप्पणी भेजें