पत्रकारिता क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल इलेक्ट्रिक मॅन अभय डी. रंगारी यांना 'महाराष्ट्र लोकनायक पुरस्कार' प्रदान.
मंगलवार, 4 अगस्त 2026
Comment
"साप्ताहिक जनता की आवाज"
शेगाव :- लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या जयंतीनिमित्त तसेच दैनिक लोक युवाच्या वर्धापनदिनानिमित्त संत गजानन महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या शेगाव नगरीत राज्यस्तरीय 'महाराष्ट्र लोकनायक पुरस्कार-२०२६' पुरस्कार वितरण सोहळा राज्यातील विविध मान्यवरांच्या उपस्थितीत उत्साहात पार पडला. महाराष्ट्र राज्यातील विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करून समाजहित, राष्ट्रहित व जनसेवा यासाठी समर्पित असलेल्या कर्तृत्ववान व्यक्तिमत्त्वांचा गौरव करण्याच्या उद्देशाने हा प्रतिष्ठेचा पुरस्कार प्रदान करण्यात येतो.
पत्रकारिता क्षेत्रातील उल्लेखनीय व अमूल्य योगदानाबद्दल इलेक्ट्रिक मॅन अभय डी. रंगारी यांना 'महाराष्ट्र लोकनायक पुरस्कार' प्रदान करून गौरविण्यात आले. पत्रकारिता क्षेत्रातील त्यांच्या सातत्यपूर्ण कार्याची, समाजहिताच्या प्रश्नांवर केलेल्या निर्भीड लेखणीची तसेच सामाजिक जनजागृतीसाठी दिलेल्या योगदानाची दखल घेत त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला .
अभय डी. रंगारी यांनी हा सन्मान आपल्या कार्याला मिळालेली प्रेरणा असल्याचे सांगत, भविष्यातही पत्रकारितेच्या माध्यमातून समाजहिताचे कार्य अधिक जोमाने सुरू ठेवण्याचा निर्धार व्यक्त केला. अभय च्या चाहत्यांनी त्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा दिल्या.
«"खिचो न कमान को,
न तलवार निकालो,
जब तोफ मुकलीब हो,
तो अखबार निकालो."»
या ओळींप्रमाणे पत्रकारिता ही समाजपरिवर्तनाचे प्रभावी माध्यम असल्याचा विश्वास बाळगणारे अभय डी. रंगारी यांची ओळख "अभय की कलम, हर समस्या पर मलम" अशी आहे.
"कलम की ताकत दुनिया की हर ताकत से बडी होती है." या विचाराला अनुसरून त्यांनी आपल्या लेखणीच्या माध्यमातून समाजातील विविध प्रश्नांवर सातत्याने लिखाण केले आहे. "तीन रुपये की कलम से, जबतक श्याही खतम नहीं होती तब तक तीस करोड लोगो को वैचारिक रूप से प्रभावित करणे वाला अभय डी. रंगारी" अशी त्यांची ओळख अनेकांच्या मनात निर्माण झाली आहे.
"ना चिंता, ना भय – मदतीसाठी अभय" या ब्रीदवाक्यानुसार अन्यायावर लेखणीने प्रहार करून न्याय प्रस्थापित करण्यासाठी अभय डी. रंगारी यांनी आजपर्यंत सातत्याने कार्य केले आहे. त्यांच्या लेखणीतून समाजहित, राष्ट्रहित, जनजागृती, लोकशाही मूल्यांचे जतन आणि सर्वसामान्यांच्या प्रश्नांना वाचा फोडण्याचे कार्य अविरत सुरू आहे.
त्यांच्या उल्लेखनीय कार्याची दखल घेत त्यांना विविध राज्यस्तरीय व राष्ट्रीय स्तरावरील अनेक पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे.
त्यामध्ये –
1. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे समाजसेवक पुरस्कार (निवड) – औरंगाबाद (संभाजीनगर)
2. कुशल नेतृत्व जननायक लोकगौरव पुरस्कार – मुंबई
3. गोल्डन पिकॉक अवार्ड – मुंबई
4. मानवाधिकार पुरस्कार – अहिल्यानगर
5. डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय विचार प्रेरणा पुरस्कार – कोल्हापूर
6. जीवनगौरव पुरस्कार – पवनी, भंडारा
7. प्रबोधिनी स्टार पुरस्कार – चंद्रपूर
8. प्रजासत्ताक गौरव मानवसेवा पुरस्कार – ठाणे
9. राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुले समाजभूषण पुरस्कार – नागपूर
10. महाराष्ट्र भूषण सन्मान – २०२६ – आनंदी युनिव्हर्स फाउंडेशन, पुणे
11. महाराष्ट्र एक्सलन्स अवार्ड – बुलढाणा
कुशल नेतृत्व, जननायक, लोकगौरव, जनसामान्यांना असामान्य बुलंद आवाज , विराट व्यक्तिमत्त्वाचे धनी, राजकीय विश्लेषक, वादळी वेदनेचे विद्रोही महाकवी, लेखक, साहित्यकार, मुक्त पत्रकार, समाजसेवक, कुशल संघटक, अन्यायाच्या विरोधात लेखणीच्या माध्यमातून शब्दांना एकत्र करून शब्दांच्या तेजाने जनतेला आपलेसे करणारे, "आदमी देखकर आदमी की पहचान करणे वाला आदमी" अशी ओळख असणारे तसेच विद्युत वेगाने प्रचार आणि प्रसार करणारे "इलेक्ट्रिक मॅन" म्हणून सर्वत्र प्रसिद्ध असलेले अभय डी. रंगारी यांच्या कार्यकर्तृत्वाचा गौरव म्हणून हा पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात आला.
कविता, लेख, बातमी, विश्लेषण, समीक्षा आदी विविध साहित्यिक व पत्रकारितेच्या क्षेत्रांत त्यांची लेखणी प्रभावीपणे चालते. लोकशाहीचा चौथा स्तंभ अधिक सक्षम, सशक्त आणि जनतेच्या विश्वासास पात्र राहावा यासाठी ते सातत्याने प्रयत्नशील असून, पत्रकारितेच्या माध्यमातून अन्याय, भ्रष्टाचार, सामाजिक प्रश्न, जनहिताचे विषय आणि लोककल्याणाच्या मुद्द्यांवर निर्भीडपणे लेखन करून समाजमन जागृत करण्याचे कार्य करीत आहेत. त्यांच्या या उल्लेखनीय, सातत्यपूर्ण आणि समाजाभिमुख कार्याचा गौरव म्हणून त्यांना 'महाराष्ट्र लोकनायक पुरस्कार-२०२६' प्रदान करण्यात आला.
0 Response to "पत्रकारिता क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल इलेक्ट्रिक मॅन अभय डी. रंगारी यांना 'महाराष्ट्र लोकनायक पुरस्कार' प्रदान."
एक टिप्पणी भेजें