दिव्यांग विद्यालय वस्तीगृहात संस्थाचालक व कर्मचाऱ्यांची निष्काळजीपणा थांबविण्याची गरज.- विजय चौडेवार.
सोमवार, 24 अगस्त 2026
Comment
विजय चौडेकर
"साप्ताहिक जनता की आवाज"
नांदेड :- देगलूर मध्ये दिव्यांग वस्तीगृह शाळा आहे, आणि तीथे काहि दिवसा पूर्वी दिव्यांग विद्यालयाची विद्यार्थ्यांनी वस्तीगृहात वास्तव्यास होती तेथील कर्मचारी तीच्यावर अत्याचार करत होता आणी तीला हे सहन होत नव्हता त्यामुळे तीने आपल्या आजीला तो प्रकार सांगितला आणि जीवन संपविले असेच अत्याचार बर्याच शासकीय वसतिगृहा मध्ये होत असतात.
परंतु दिव्यांग वस्तीगृह संचालक,शिक्षक, यांच्या दबावाखाली विद्यार्थी राहत असतात त्यांना धमकी दिली जाते हे जर कुणाला सांगितलं तर तुझे जेवन बंद करून मारुन वगेरे वगेरे,टाकण्यात येईल त्यांच्या दबावाखाली ह्या मुली गप्प बसतात किंवा आपले जीवन आत्महत्या करून संपवतात आणि त्या कडे सरकार गांभीर्याने लक्ष देत नाही असं का?. प्रत्येक वस्तीगृहामधे मुली सुरक्षीत आहेत का हे तपासने खुप गरजेचे आहे, शासकीय वसतिगृहामधे जर तपासनी वेळोवेळी केली तर प्रत्येक बाबी चा उलगडा होऊ शकतो कारण कुठे जेवन नित्कृष्ट दर्जा चे असते, कुठे शौचालय ची व्यवस्था खराब असते बाथरुम मध्ये घाणीचे साम्राज्य पसरलेले असते.
झोपण्याची व्यवस्था ठिक नसते जसे की जेवणाचा दर्जा खराब असतो खेळण्यासाठी जागेचा अभाव, स्वयंपाक घरात अस्वस्थता, आणि सर्वात महत्वाचे म्हणजे वसतिगृहात रात्रीच्या वेळी वाचमन, सुरक्षा रक्षक नसतो विद्यार्थ्यांची सुरक्षा कोण करणार याचा विचार करने गरजेचे आहे शासन वस्तीगृह चालवण्यासाठी एवढाले लाखो रुपये अनुदान देते हे कशा मुळे मिडीयाला बर्याच ठिकाणी असे निदर्शनास आले आहे, वस्तीगृहात वास्तव्यास आहेत ते अती गरिब दुर्बल घटकातील अंध, मुकबधीर,दिव्यांग, विद्यार्थी शिकतात त्यांची जबाबदारी कोणावर आहे.
हे संस्था संचालक नुसते अनुदान लाटण्यासाठी आहे त का! आजच्या घडीला शासकीय दिव्यांग वसतिगृहात लैंगिक शोषणाचे प्रमाण खुप वाढले आहे,जरी काही बाबी निदर्शनास आल्यास हे वस्तीगृह संचालक तीथेच हे प्रकरण दाबून टाकण्याचा प्रयत्न करतात कारण त्यांची पोहोंच वरपर्यंत असते आणि गरिब अत्याचार पिडीत मुलींचा वाली कोणी ही नसतो जनतेचे मत आहे प्रत्येक वसतिगृहाची चौकशी करून जिथे भयानक प्रकार घडत आहेत त्यांच्या वर कडक कारवाई करावी अशा लिंग पिसाट भडव्यांना फाशी ची शिक्षा देण्यात यावी आणि ज्या वस्तीगृहात विद्यार्थ्यांची गैरसोय होत असेल प्रत्येक बाबींचा अभाव असेल त्या संस्थेचे अनुदान बंद करून मान्यता रद्द करण्यात यावी, अशी मी शासणाला आवेदन करतो.
विजय चौडेकर, पत्रकार, सामाजिक कार्यकर्ता,9529944770
0 Response to "दिव्यांग विद्यालय वस्तीगृहात संस्थाचालक व कर्मचाऱ्यांची निष्काळजीपणा थांबविण्याची गरज.- विजय चौडेवार."
एक टिप्पणी भेजें