-->
पत्रकारांवर भ्याड हल्ल्याचा साकोलीत निषेध.

पत्रकारांवर भ्याड हल्ल्याचा साकोलीत निषेध.


 • मुख्यमंत्र्यांना उपविभागीय पोलीस अधिकारी यांचे मार्फत पत्रकारांचे निवेदन सादर.

.            निवेदन देतांना व्हाइस मिडिया चे पत्रकार 

  संजीव भांबोरे 
"साप्ताहिक जनता की आवाज" 

भंडारा :- कारंजा घाडगे जि. वर्धा येथील "दैनिक महासागर" चे पत्रकार धीरज कसारे यांना भेसळखोर तेल विक्रेत्याने जीवे मारायची धमकी दिली. हा थेट लोकशाहीवर हल्ला असून याच्या निषेधार्थ साकोलीत व्हॉईस ऑफ मीडिया व तालुका पत्रकार संघाने ( सोम. २४ ऑगस्ट ) ला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना साकोली उपविभागीय पोलीस अधिकारी शिवम विसापूरे यांचे मार्फत निवेदन सादर करण्यात आले. 
◻️दिलेल्या निवेदनात नमूद केले की, विषयांकीत कारंजा घाडगे येथील पत्रकारावर झालेल्या हल्ल्याच्या विरोधात दोषीवर पत्रकार संरक्षण कायदा अंतर्गत गुन्हा दाखल करून दोषींवर कायदेशीर कारवाई करण्याबाबत. हे निवेदन दिले आहे. यात "दैनिक महासागर" चे प्रतिनिधी धीरज कसारे यांनी "कारंजा तालुक्यात भेसळ व नागरिकांच्या जीवाशी जीवघेणा खेळ" ही बातमी प्रकाशित केली. त्यावर तेथील होलसेल तेल विक्रेते अनुज राजेश जसानी यांनी पोलीस ठाणे आवारातच पत्रकार धीरज कसारे यांना मारण्याची धमकी दिली. आणि कसारे यांना जबरदस्तीने पोलीस ठाणे येथून गाडीवर बसविण्याचा प्रयत्न केला. आणि या घटनेचा साकोली व्हॉईस ऑफ मीडिया व तालुका पत्रकार संघ साकोली वतीने निषेध करण्यात येत आहे. कारण आज एक निर्भिड आय ए एस अधिकारी श्री. तुकाराम मुंढे हे नागरिकांचे आरोग्य सुदृढ आणि निरोगी राहण्यासाठी भेसळखोरांवर कायदेशीर कारवाईचा बडगा उगारला आहे. यावर पत्रकारांनी या आधारे होत असलेल्या भेसळखोरांबाबद जनतेत जनजागृती व्हावी यासाठी पत्रकारांनी बातमीही प्रसिद्ध करायची नाही का. झालेली ही घटना अगदी निंदनीय असून पत्रकारांवर हल्ला म्हणजे थेट लोकशाहीवर हल्ला आहे. आणि यातील दोषींवर पत्रकार संरक्षण कायदा अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात यावा. तेथील भेसळखोरांच्या गोडाऊनची चौकशी करून सर्व त्या भेसळखोरांचा पर्दाफाश करण्यात यावा. तसेच दोषीने सर्वांसमोर त्या कर्तव्यदक्ष पत्रकार धीरज कसारे यांची जाहीरपणे माफी मागण्यात यावी. करीता आम्ही सर्व साकोली पत्रकार वतीने आपणास याची उच्चस्तरीय चौकशीसाठी निवेदन देत आहोत असे नमूद केले आहे. 

हे निवेदन देताना "व्हॉईस ऑफ मीडिया" चे राज्य प्रवक्ते व साकोली अध्यक्ष आशिष चेडगे, जिल्हा कार्यकारिणीचे डी. जी. रंगारी, तालुका सचिव किशोर रंगारी, शहरचे ऋग्वेद येवले, महिला पदाधिकारी शितल नागदेवे, शहर सचिव प्रभारी किशोर बावणे, यशवंत कापगते यांसह तालुका पत्रकार संघाचे सदस्यगण उपस्थित होते.

0 Response to "पत्रकारांवर भ्याड हल्ल्याचा साकोलीत निषेध."

एक टिप्पणी भेजें

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article