-->
तुमसर तालुक्यातील सिंदपुरी येथे नागपंचमी उत्सव.

तुमसर तालुक्यातील सिंदपुरी येथे नागपंचमी उत्सव.


• 57 वर्षांपासून सर्पदंशावर मोफत उपचाराची अविरत परंपरा
       हर्षवर्धन देशभ्रतार 
"साप्ताहिक जनता की आवाज" 

  तुमसर :- तालुक्यातील ऐतिहासिक व धार्मिक महत्त्व असलेल्या सिंदापुरी गावात नागार्जुन मंडळाच्या वतीने यंदाचा नागपंचमी उत्सव अत्यंत उत्साहपूर्ण व भक्तिमय वातावरणात पार पडला. वर्ष १९५७ मध्ये स्थापन झालेल्या या नागार्जुन मंडळाच्या वतीने गेल्या अनेक दशकांपासून नागपंचमीची परंपरा मोठ्या थाटामाटात जपली जात असून, संपूर्ण गावात या दिवशी आनंदाचे वातावरण पाहायला मिळते.

आजच्या आधुनिक आणि वैज्ञानिक युगात जिथे प्रत्येक गोष्टीकडे विज्ञानाच्या दृष्टिकोनातून पाहिले जाते, तिथेच सिंदापुरी येथील या मंदिराचे अध्यात्मिक आणि सामाजिक कार्य लोकांच्या श्रद्धेचा व विश्वासाचा केंद्रबिंदू ठरत आहे. या मंडळांतर्गत सर्पदंश तसेच अत्यंत विषारी मानल्या जाणाऱ्या 'टवऱ्या' प्रजातीच्या सापाच्या विषाचे निवारण करण्याचे काम अविरतपणे केले जात आहे. या धार्मिक आस्थेमुळे आणि जनसेवेच्या कार्यामुळे केवळ

सिंदापुरीच नव्हे, तर आजूबाजूच्या अनेक गावांतील हजारो भाविक आणि नागरिक या उत्सवात मोठ्या श्रद्धेने सहभागी होतात.

या उत्सवाचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे येथे पाहायला मिळणारी सामाजिक एकता. जात, धर्म आणि पंथाच्या भिंती बाजूला सारून प्रत्येक समाजातील नागरिक एकत्र येतात आणि हा सण गुण्यागोविंदाने साजरा करतात. सामाजिक सलोखा आणि बंधुभावाचे एक उत्तम उदाहरण म्हणून या उत्सवाकडे पाहिले जाते.

हा सोहळा यशस्वीरीत्या पार पाडण्यासाठी नागार्जुन मंडळाचे अध्यक्ष श्रीकृष्ण शुक्ला यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व सदस्यांनी अथक परिश्रम घेतले. यात भैयालाल वैद्य, अशोक निकुळे, महेश सिंगनजुडे, चंद्रशेखर रीनायते, राहुल निकुळे, तन्मय शुक्ला, प्रकाश निकुळे, महेंद्र राऊत, मिथुन कोहळे, विकास कटरे, संतोष सिंगनजुडे, शैलेश वैद्य, मयूर बोरकर, साहुल चौधरी यांच्यासह मंडळाच्या इतर सर्व सदस्यांनी मोलाचे योगदान दिले. सर्व ग्रामस्थांच्याआणि भाविकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे यंदाचा नागपंचमी उत्सव अत्यंत उत्साहात आणि यशस्वीपणे संपन्न झाला.

0 Response to "तुमसर तालुक्यातील सिंदपुरी येथे नागपंचमी उत्सव."

एक टिप्पणी भेजें

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article