-->
ध्रुवतारा अपंग क्रांतिकारी सामाजिक संघटनेचे संस्थापक समाजसेवक श्रीकृष्ण देशभ्रतार युथ फॉर जॉब या जिल्हा कार्यालयाला भंडारा येथे भेट!..

ध्रुवतारा अपंग क्रांतिकारी सामाजिक संघटनेचे संस्थापक समाजसेवक श्रीकृष्ण देशभ्रतार युथ फॉर जॉब या जिल्हा कार्यालयाला भंडारा येथे भेट!..

• युथ 4 जाब फाउंडेशन दिव्यांगांच्या क्रिडा कौशल्य रोजगारासाठी एक नवे दालन..समाजसेवक श्रीकृष्ण देशभ्रतार.

          दिगंबर देशभ्रतार
 "साप्ताहिक जनता की आवाज"

भंडारा :- भंडारा येथील "युथ फॉर जॉब" या जिल्हा कार्यालयाला "ध्रुवतारा अपंग क्रांतिकारी सामाजिक संघटना. संपूर्ण भारत" तथा "साप्ताहिक जनता की आवाज" या वृत्तपत्राचे मुख्य संपादक समाजसेवक श्रीकृष्णजी देशभरात यांनी भेट दिली, असता कार्यालयीन ट्रेनर धिकारी "अश्विन भेंडाकर साहेब" यांच्या कडून युथ फार जॉब या कार्यालयांविषयी माहिती घेतली. तसेच कार्यालय द्वारा दिव्यांगांच्या उत्पन्नासाठी योजनांचा माहिती देत जसे दिव्यांगांना मनोबल वाढविण्यासाठी राज्य व केंद्र शासन द्वारा विविध योजना विषयी पुरस्कृत करणे, त्यांना ऋण लाभ देऊन स्वंयम रोजगार विमुक्त करणे, संजय गांधी, बालसंगोपन, इत्यादी अनेक राबविण्यात येणाऱ्या योजनांची दिव्यांगानां मिळणाऱ्या लाभाविषयी माहिती घेतली. "युथ फॉर जाब" या कार्याद्वारे समाजसेवक श्रीकृष्ण देशभ्रतार व त्यांचे केंद्रीय सहकारी समाज प्रबोधन रेडिओ टी. व्ही. सिंगर शिवदासजी वहाणे यांचे स्वागत करत पुरस्कृत योजनांचा दिव्यांगानं लाभ दिला जाईल,असे जिल्हा कार्यालय ट्रेनर अधिकारी अविनाश भेंडारकर यांनी आश्वासन देत शुभेच्छा दिल्या.
त्याचप्रमाणे समाजसेवक श्रीकृष्ण देशभरात यांनी युथ फॉर जॉब हे फाउंडेशन हे कार्यालय दिव्यांगांच्या क्रीडा व कौशल्य स्वाभिमान उत्पन्नासाठी योगदान असून एक नवे दालन आहे असे आपले मनोगत व्यक्त केले . 
 उपस्थित त्यामध्ये कार्यालयीन कर्मचारी प्रशांत शिवणकर, सचिन रहागंडाले पुजा नागदेवे, प्रशांत तिरपुडे व लक्ष्मीकांत नागदिवे इतर दिव्यांग लाभार्थी उपस्थित होते.

0 Response to "ध्रुवतारा अपंग क्रांतिकारी सामाजिक संघटनेचे संस्थापक समाजसेवक श्रीकृष्ण देशभ्रतार युथ फॉर जॉब या जिल्हा कार्यालयाला भंडारा येथे भेट!.."

एक टिप्पणी भेजें

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article