-->
उच्चतंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील व अर्थ, नियोजन मंत्री आशिष जी जयस्वाल.यांना महाराष्ट्र सार्वजनिक ग्रंथालय कर्मचारी संघटने द्वारा निवेदन.

उच्चतंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील व अर्थ, नियोजन मंत्री आशिष जी जयस्वाल.यांना महाराष्ट्र सार्वजनिक ग्रंथालय कर्मचारी संघटने द्वारा निवेदन.



• उच्चतंत्र शिक्षण मंत्री व अर्थ नियोजन मंत्री.यांनी आपल्या पूर्ण मागण्याचा निर्णय घेण्यात येईल असे महाराष्ट्र सार्वजनिक ग्रंथालय कर्मचारी शिष्टमंडळास दिले आश्वासन.
            प्रदीप कडबे 
"साप्ताहिक जनता की आवाज" 

 मुंबई/नागपूर :- आज दि ४/८/२०२६ला मंत्रालय मुंबई येथे दु ४ वाजता उच्च व तंत्र शिक्षण मंत्री ना. चंद्रकांत पाटील यांचे दालनात मा. अर्थ व नियोजन मंत्री ऍड श्री आशिष जयस्वाल यांचे उपस्थिती मध्ये महाराष्ट्र सार्वजनिक ग्रंथालय कर्मचारी संघटनेचे कार्यवाह नंदू बनसोड, नागपूर जिल्हा ग्रंथालय संघाचे अध्यक्ष श्री प्रेमराज कुबडे, रामटेक तालुका संघाचे अध्यक्ष श्री दिपक मोहोड, कार्यवाह सागर्जी लोंढे, सुनील बादुले, मनोज मानकर, सौं मीनाक्षी बनसोड यांचे शिष्टमंडळा सोबत खालील विषयावर चर्चा करण्यात येऊन मा. अर्थ राज्यमंत्री आशिष जैस्वाल यांच्या पुढाकाराणे खालील निर्णय घेण्यात आले.
महाराष्ट्रातील ग्रंथालये सक्षम करण्यासाठी जिल्हा नियोजन समिती अंतर्गत महाराष्ट्रातील सार्वजनिक ग्रंथालयांना जास्तीत जास्त निधी कसा देता येईल या विषयावर चर्चा होउन,
 खालील मुद्यावर निर्णय घेण्यात आले.

१) ग्रंथालयांना ४०%अनुदान मंजूर करण्यात आले.

२) ग्रंथालयांचे वर्ग बदल करण्याबात निर्णय घेण्यात आला.

३) ग्रंथमित्र पुरस्कार मिळणाऱ्या लोकांना दलित मित्रांना मिळणाऱ्या सोई सुविधा नुसार ग्रंथ मित्रांना सुविधा मिळण्याबाबत निर्णय घेण्यात आला. 

४) तसेच महाराष्ट्र राज्यातील २५, ५०, ५७, १०० वर्ष पूर्ण होणाऱ्या ग्रंथालयांना विशेष अनुदान मंजूर करण्यात आले.

संबंधित विषयावर मा. ग्रंथालय संचालक श्री अशोकराव गाडेकर साहेब यांना ताबडतोब जी.आर. व कागदपत्रे मागवून त्यावर लवकरच निर्णय घेण्यात येईल असें 
मा. अर्थ राज्यमंत्री ऍड आशिष जैस्वाल यांनी शिष्टमंडळास आस्वशन दिले.

0 Response to "उच्चतंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील व अर्थ, नियोजन मंत्री आशिष जी जयस्वाल.यांना महाराष्ट्र सार्वजनिक ग्रंथालय कर्मचारी संघटने द्वारा निवेदन."

एक टिप्पणी भेजें

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article