तेल्हारा येथे लोककवी वामनदादा कर्डक जयंती उत्साहात.
रविवार, 16 अगस्त 2026
Comment
• मान्यवरांच्या उपस्थितीत समता कला मंचाच्या वतीने अभिवादन!.
सदानंद मोरे (जिल्हा प्रति.)
"साप्ताहिक जनता जे आवाज"
अकोला :- तेल्हारा दिनांक 15 ऑगस्ट,: तेल्हारा येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्यानात क्षमता कला मंचाच्या वतीने लोककवी वामनदादा कर्डक यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.
यावेळी उपस्थित मान्यवरांनी वामनदादा कर्डक यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वंचित बहुजन आघाडीचे तेल्हारा तालुका अध्यक्ष अशोक भाऊ दारोकार होते. यावेळी समता कला मंच तसेच अखिल भारतीय न्याय हक्क समितीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थितीत होते. अध्यक्षीय भाषणातून अशोक भाऊ दारोकार यांनी लोककवी वामनदादा कर्डक यांच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकत त्यांच्या साहित्य, शाहिरी आणि सामाजिक प्रबोधनाच्या कार्याचे महत्त्व विशद केले.
वामनदादांनी आपल्या शाहिरीच्या माध्यमातून समाजातील वंचित , शोषित पटकन त्या प्रश्नांना आवाज दिला, असे त्यांनी सांगितले. यावेळी शेषराव वाकोडे, बाळासाहेब बोदडे, ग्रंथ मित्र कविवर्य रामेश्वर पोहेकर, भीम शाहीर प्रबोधनकार सदानंद मोरे, ह भ प बाळकृष्ण महाराज वाकोडे, संघपाल दामोदर, प्रकाश बोदडे, यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी समता कला मंचाच्या पदाधिकारी परिश्रम घेतले. आभार प्रदर्शन समता संस्कृती कला बहुउद्देशीय संस्था, गाडेगाव चे अध्यक्ष रवींद्र विरघट यांनी केले.
0 Response to "तेल्हारा येथे लोककवी वामनदादा कर्डक जयंती उत्साहात."
एक टिप्पणी भेजें