-->
श्रीकांत नागदेवे यांचे कलावंत मानधन समिती रद्द करा याकरिता ९ दिवसांपासून आमरण उपोषण सुरू.

श्रीकांत नागदेवे यांचे कलावंत मानधन समिती रद्द करा याकरिता ९ दिवसांपासून आमरण उपोषण सुरू.


• जिल्हा प्रशासनाचे दुर्लक्ष

• 2 सप्टेंबर ला जिल्हाधिकारी यांनी बोलावलेल्या बैठकीमध्ये काय निर्णय होते त्याकडे सर्व कलावंतांचे लक्ष.

संजीव भांबोरे 
"साप्ताहिक जनता की आवाज"
 
भंडारा :- येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर दिनांक २४/८/२०२६ पासून जिल्ह्यातील संपूर्ण कलावंतांच्या न्याय हक्कासाठी एकूण चार प्रमुख मागण्या घेऊन श्रीकांत अंबादास नागदेवे संस्थापक/ अध्यक्ष अमरकला सांस्कृतिक संघटना महाराष्ट्र राज्य हे जिल्हाधिकारी कार्यालय समोरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक येथेआमरण उपोषणावर बसलेले आहेत, आज उपोषणाला संपूर्ण 9 दिवस झाले तरी जिल्हा शासन प्रशासनाने कोणती ठोस कारवाई केलेली नाही. व अद्यापही या आमरण उपोषणाची दखल घेतलेली नाही,.दिनांक ३१/८/२०२६ ला पत्र क्रमांक/भजी/पंचा/कला/ ३४६९/२०२६/जिल्हा परिषद भंडारा ग्रामपंचायत विभागाकडून जिल्हाधिकारी भंडारा यांचे आदेश दिनांक 3 ऑगस्ट २०२६ यांचे संदर्भ घेऊन दिनांक २/९/२०२६ ला सदर निवड समिती ची बैठक आयोजित केलेली आहे व आमरण उपोषणाला बसलेले श्रीकांत नागदेवे आणि शिष्टमंडळाला या बैठकीला उपस्थित राहण्याचे निमंत्रण सुद्धा दिले आहे. उद्याच्या बैठकीत उपोषणार्थी व शिष्टमंडळ उपस्थित असतील असे कळवले आहे .परंतु मागणी क्रमांक १ राजश्री शाहू महाराज ज्येष्ठ साहित्यिक व कलावंत मानधन सन्मान योजनेची जिल्हा जिल्ह्यातील नवनिर्मित अशासकीय निवड समिती रद्द करावी, जिल्ह्यातील लोककलेतील नामवंत व जेष्ठ कलावंतांची नियुक्ती निवड समितीत करावी , जिल्ह्यातील सदर योजनेअंतर्गत बोगस कलावंतांना मिळणारे मानधन तात्काळ बंद करावे, ज्याप्रमाणे कलावंतांच्या मानधनात अटी व शर्ती आहेत त्याचप्रमाणे निवड समितीवरील सदस्यांची निवड करताना निकष म्हणजेच अटी शर्ती लागू करावे, अशा प्रमुख मागण्या आहेत. दिनांक २/९/२०२६ च्या बैठकीत सदर मागण्या मान्य न झाल्यास सदर आंदोलनाची तीव्रता वाढून संपूर्ण जिल्ह्यातील कलावंत सामूहिकरीत्या आमरण उपोषण करतील आणि याची सर्व जबाबदारी शासन ,प्रशासनाची राहील असे अमरकला सांस्कृतिक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष उपोषणार्थी श्रीकांत नागदेवे यांनी कळविले आहे.

0 Response to "श्रीकांत नागदेवे यांचे कलावंत मानधन समिती रद्द करा याकरिता ९ दिवसांपासून आमरण उपोषण सुरू."

एक टिप्पणी भेजें

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article