सर्वस्तरीय कलावंतांच्या विविध मागण्यांकरिता भंडाऱ्यात कलाकारांचे संगीतमय आंदोलन.
बुधवार, 2 सितंबर 2026
Comment
नागपूर विभागीय विशेष प्रतिनिधी :
प्रदीप कडबे.
"साप्ताहिक जनता की आवाज"
भंडारा :- भंडारा जिल्हा संयुक्त कलाकार महासंघ यांच्या वतीने आयोजित राजर्षी शाहू महाराज जेष्ठ साहित्यीक कलावंत मानधन अशासकीय निवड सदस्य समिती रद्द करा, जिल्ह्यातून किमान 500 कलावंतांची निवड मानधन साठी झाली पाहिजे, सन 2025-26 मधील वृद्ध जेष्ठ कलावंतांच्या सर्व प्रलंबित फाईल तात्काळ निकाली काढून पात्र कलावंतांना मानधन मंजुर करावे, निवड समिती मध्ये नामांकित कलावंत, तहसील,जिल्हा,राज्यस्तरीय ,पुरस्कार प्राप्त कलावंतांना घ्यावे व विविध मागण्या विषयी सामाजिक चळवळीचे नेते परमानंद मेश्राम यांच्या नेतृत्वात भंडारा येथे संगीतमय आंदोलन आयोजित करण्यात आले होते.
त्रिमूर्ती चौक मधील बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णकृती पुतळ्याला माल्यार्पण व अभिवादन करून आंदोलनाला सुरुवात करण्यात आली.समोर ८ डफरी वादक, बासरी वादक यांच्या सुरमई आवाजात आंदोलनाला सुरुवात करण्यात आली.
जिल्ह्यातील विविध क्षेत्रातील कलावंत आपल्या वेशभूषेत आलेले होते व संगीतमय वातावरणात रॅली ही बस स्टॉप मार्गे पोस्ट ऑफिस चौक, मुस्लिम लायब्ररी चौकातून पुन्हा त्याच मार्गे परत येऊन डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्या समोर सभा घेण्यात आली.
संगीतमय आंदोलनात , वेशभूषा मध्ये हनुमान जी, शंकर भगवान, डान्सर , लावळीन, आणि विविध कलाकृती सादर करण्यात आल्या शाहीर भगवान दहिवले, सोमप्रभू तांदूळकर, कवी नाशिक चवरे यांनी सुंदर कलावंतांची व्यथा मांडणारे गीत डोलकी, डफ, टाळ, सूर, हे साहित्य सोबत घेऊन सादर केली.
आंदोलन प्रसंगी आंदोलनाचे नेतृत्व करणारे सामाजिक चळवळीचे नेते परमानंद मेश्राम, भावेश कोटांगले, डॉ. पुरुषोत्तम बोन्द्रे ,नाशिक चवरे, सोमप्रभु तांदुळकर यांनी मार्गदर्शन केले.
सभा सुरू असताना आंदोलन स्थळी निवासी उपजिल्हाधिकारी साहेब यांनी भेट दिली , व सकारात्मक उत्तरे न मिळाल्याने आंदोलनाचे नेतृत्व करणारे परमानंद मेश्राम यांच्या नेतृत्वाखाली रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.आणि काही वेडाने थेट जिल्हाधिकारी कार्यालयासमोर कलावंतांचे संगीतमय आंदोलन सुरू झाले.
त्यावेळी राजर्षी शाहू महाराज जेष्ठ साहित्यीक मानधन समिती सचिव उपमुख्यकार्यकारी अधिकारी नंदागवळी साहेब, अप्पर जिल्हाधिकारी, निवासी उपजिल्हाधिकारी व वरिष्ठ अधिकारी यांनी येऊन आंदोलनाच्या मागण्या विषयी विचारणा केली व सकारात्मक चर्चा केली 2 सप्टेंबर ला जिल्हाधिकारी कार्यालयात अशासकीय सदस्य यांची बैठक बोलावून योग्य ती कारवाही करू अशी ग्वाही दिली.या कलाकारांच्या संगीतमय आंदोलनाने भंडारा शहरातील लोकांचे लक्ष वेधून घेतले होते.
आंदोलन यशवी करण्यासाठी भंडारा जिल्हा संयुक्त कलाकार महासंघाचे अध्यक्ष भावेश कोटांगले तसेच गणेश आथिलकर, डॉ.पुरुषोत्तम बोन्द्रे, नत्थु बांते, सोमप्रभु तांदुळकर,गणेश देशमुख,पत्रकार / भीमशाहीर प्रदीप कडबे,नाशिक चवरे, उमेश भोयर,लक्ष्मीकांत मेश्राम, अमित हारगुडे,मारुती निंबार्ते, भूमालाताई उईके, प्रिया शहारे,प्रियंका गायधनी, अर्चना कान्हेकर, गीता रामटेके, सुरमा बारसागडे, तिर्थानंद बोरकर संदिप कोटांगले, निलाराम बागडे, मनोहर बोरकर, शेखर कावळे, सचिन गेडाम, शाहीर मुकेश देशमुख, रंजित खंडाळे,राजकुमार खंडाळे,दिनेश खोब्रागडे व भंडारा जिल्ह्यातील बहुसंख्य कलावंत यांनी सहकार्य केले.
0 Response to "सर्वस्तरीय कलावंतांच्या विविध मागण्यांकरिता भंडाऱ्यात कलाकारांचे संगीतमय आंदोलन."
एक टिप्पणी भेजें