केसलवाडा पवार येथे दोन दिवसीय विदर्भस्तरीय सांस्कृतिक महोत्सव वृक्षारोपण व वृक्ष दिंडी
शनिवार, 12 सितंबर 2026
Comment
संजीव भांबोरे
"साप्ताहिक जनता की आवाज"
भंडारा :- लाखनी तालुक्यातील येथे विदर्भ शहरी कलाकार परिषद कणाल स्वर्गीय सुलोचना पारधीकर बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने विदर्भ स्तरीय सांस्कृतिक महोत्सव वृक्षारोपण वृक्ष दिंडी हे आयोजन करण्यात आले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भंडारा डिस्ट्रीक्ट सेंटर को-ऑपरेटिव्ह बँक संचालक प्रा . होमराज कापगते तर उद्घाटक पाहुणे म्हणून सरपंच रोमीला बसेन , ग्राम विस्तार अधिकारी दत्ता पोहरकर शाहीर कलाकार परिषदेचे अलंकार टेंभुर्णी महाजन समितीचे सदस्य शैलेश गजभिये ,नामदेव ठाकरे युवराज मेश्राम, जिल्हाध्यक्ष डॉ रामनाथ पारधीकर ,मिलिंद खोब्रागडे रमेश रामटेके ,ज्योती वाघाये, पत्रकार व सामाजिक कार्यकर्ते डी जी रंगारी , यांच्या उपस्थितीत संपन्न झाली
सर्वप्रथम सर्व विदर्भ शाहीर कलाकार परिषद व सुलोचना पारधीकर बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने पूर्ण गावांमध्ये गावामध्ये ठिकठिकाणी वृक्षारोपण करण्यात आले व नंतर वृक्षदिंडी काढण्यात आली या दोन दिवसात कार्यक्रमांमध्ये भजन , किर्तन भारुड पोवाडा, नकला,गोंधळ तमाशा व असे विविध सांस्कृतिक कार्यक्रम कार्यक्रम घेण्यात आले.
ज्यांच्या ज्यांच्या सामाजिक क्षेत्रात व कलाकार क्षेत्रात योगदान आहे अशांच्या पुष्पगुच्छ , शाल प्रमाणपत्र स्मृती चिन्ह करण्यात आला त्यामध्ये जिल्हाध्यक्ष डॉ रामनाथ पारधीकर, पत्रकार व सामाजिक कार्यकर्ते डी जी रंगारी उपस्थित होते
जिल्हाध्यक्ष डॉ रामनाथ पारधीकर यांनी
सांगताना सांगितले की कलाकार परिषद घेण्यामागील उद्देश असा आहे की कलाकारांमधील असलेल्या कलागुणांना अधिक वाव मिळावा व कलाकारांच्या संघटन वाढावं या संघटनेच्या माध्यमातून त्यांचे प्रश्न सोडवल्या जाऊ शकतील व समोरच्या भविष्यात त्यांना मानसन्मान मिळेल आर्थिक मदत मिळेल त्या दृष्टिकोनातून वरच्या स्तरावरून संघटनेच्या माध्यमातून प्रयत्न करण्यात संघटना सफल होत आहे व त्यासाठी सर्व कलाकारांनी एकत्रितपणे काम केले पाहिजे असे मत डॉ रामनाथ पारधीकर यांनी आपल्या भाषणांमधून मत व्यक्त केले.
सर्व मान्यवरांचे याप्रसंगी सरपंच रोमिला बसेन, ग्राम विस्तार अधिकारी दत्ताभाऊ , पोहरकर ,हेमराज कापगते व इतर आपले मत व्यक्त केले
कार्यक्रमाचे संचालन मिलिंद खोब्रागडे यांनी केले तर आभार रामेश्वर बिसेन यांनी केले
0 Response to "केसलवाडा पवार येथे दोन दिवसीय विदर्भस्तरीय सांस्कृतिक महोत्सव वृक्षारोपण व वृक्ष दिंडी "
एक टिप्पणी भेजें