प्रत्येकाच्या आयुष्यात एक तरी कृष्ण हवा...
शनिवार, 12 सितंबर 2026
Comment
लेखक :- महंत. श्री. गोपालव्यास कपाटे पुणे.
• आपणही कुणासाठी तरी कृष्ण बनू या !
भगवान श्रीकृष्ण म्हणजे केवळ देवत्त नाही; श्रीकृष्ण म्हणजे एक विचार आहे, एक माईडसेट आहे. जगण्याची एक सकारात्मक दिशा आहे. आपल्या आयुष्यात प्रत्येकाला कधी ना कधी अशा व्यक्तींची गरज असते, जी अडचणीच्या काळात हात धरते, संभ्रमाच्या क्षणी योग्य दिशा दाखवते, पडल्यावर उभे करते आणि यश मिळाल्यावरही जमिनीवर ठेवते. म्हणूनच मला वाटते प्रत्येकाच्या आयुष्यात एक तरी कृष्ण हवा... आणि शक्य असेल तर आपण कुणासाठी तरी कृष्ण बनले पाहिजे...
श्रीकृष्णाचे जीवन पाहिले तर प्रत्येक प्रसंगातून आपल्याला जीवन जगण्याचा एक नवा दृष्टिकोन मिळतो, कृष्णाने परिस्थिती बदलण्यापेक्षा दृष्टिकोन बदलायला शिकवले.
आपल्याला खुश करण्यासाठी गोड बोलणारे अनेक लोक भेटताल; पण आपल्याला योग्य मार्गावर आणण्यासाठी कठोर सत्य सांगणारा एखादा कृष्ण आयुष्यात असणे ही मोठी संपत्ती आहे.
कुणी निराश असेल तर त्याला आशा देऊया, समजावूया कुणी पैड़त अगो. त्यालो उख्वो. त्याला उभे करूया. कृपो बते तरता वेसरोल वेतवासाठी, तरखा बोखब्ते, सठिायवर मीही योरेटा उग्रवी तवे अनि को अशेवकीन आर्थनीवर ठेवते. म्हणूनच किनत आयुष्यात एक तरी कृष्ण हवा।
आणि त्याहून महत्वाचे आपणही कुणाच्या आयुष्यात असा मित्र बनू शकतो का? कुणी निराश असेल तर त्याला आशा देऊया कुणी चुकत असेल तर प्रेमाने समजावूया कुणी पडत असेल तर त्याला उभे करूया.
कुणी यशस्वी होत असेल तर त्याच्या यशाचा मनापासून आनंद घेऊया. कारण कृष्ण होण्यासाठी मोठे पद, पैसा किंवा सत्ता लागत नाही; मोठे मन लागते...
संकट हे शेवट नसते; ते आपल्या पुढच्या रूपाची सुरूवात असते. माणसाची किंमत त्याच्याकडे काय ओहे यावर नाही, तर तो माणूस म्हणून कसा आहे यावर ठरते..
भगवान श्रीकृष्ण प्रत्येकाच्या आयुष्यात प्रत्यक्ष येतीलच असे नाही आयुष्यात नक्की येऊ शकतो.
महानुभाव उरळीकांचन पुणे
0 Response to "प्रत्येकाच्या आयुष्यात एक तरी कृष्ण हवा..."
एक टिप्पणी भेजें