पैसे कपातीच्या मेसेजला 'नो' उत्तर दिले अन् बँकेच्या खात्यातून १.७० लाख गेले.
मंगलवार, 1 सितंबर 2026
Comment
• सायबर चोरट्यांनी घातला चार्टर्ड अकाउंटंटला गंडा.
"साप्ताहिक जनता की आवाज"
न्यूज नेटवर्क
छत्रपती संभाजीनगर :- सूतगिरणी चौक परिसरातील चार्टर्ड अकाउंटंटची १ लाख ७० हजार रुपयांची ऑनलाइन फसवणूक करण्यात आली. कोणतीही लिंक ओपन न करता किंवा ओटीपी शेअर न करता, केवळ व्हॉट्सअॅपवरील संदेशाला 'नो' असे उत्तर दिल्याने ही फसवणूक झाली आहे. याप्रकरणी सोमवारी जवाहरनगर ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
सीए विष्णुकुमार ओमप्रकाश अग्रवाल (६३, रा. प्राइड एनिग्मा, सूतगिरणी चौक) यांना १९ मे रोजी दुपारी त्यांच्या इंडसइंड बँकेच्या खात्यातून ९० हजार आणि
अशी फसवणूक टाळा...
१) पैसे कपात झाल्याचा अनोळखी क्रमांकावरून व्हॉट्सअॅप संदेश आल्यास कोणताही प्रतिसाद देऊ नका.
२) संदेश खरा आहे की खोटा, हे तपासण्यासाठी बँकेच्या अॅपवर आपले स्टेटमेंट किंवा शिल्लक रक्कम तपासा.
३) बँकेने दिलेल्या कस्टमर केअर किंवा अलर्ट सुविधांचा १००% वापर करा आणि ट्रॅन्झेंक्शन आयंडी स्वतः पडताळून पाहा.
आयसीआयसीआय बँकेच्या खात्यातून ८० हजार रुपये कपात झाल्याचे २ संदेश आले. त्यानंतर लगेचच त्यांच्या व्हॉट्सअॅपवर एका अनोळखी क्रमांकावरून संदेश आला की, 'तुम्ही हा व्यवहार केला नसेल, तर 'नाही' असा संदेश पाठवा. त्यावा अग्रवाल
हॅकर्स घेतात मोबाइलचा ताबा..
हा सायबर गुन्हेगारीतील 'फिशिंग'चा अत्यंत प्रगत प्रकार आहे. सायबर चोरटे व्हॉट्सअॅपवर जो संदेश पाठवतात, त्याच्या बँक-एंडला एक 'ऑटो एक्झिक्युशन फाइल' लपलेली असते. आपण अशा संदेशाला प्रतिसाद देतो, तेव्हा ती लपलेली फाइल सक्रिय होते आणि आपल्या मोबाइलचे संपूर्ण नियंत्रण हॅकर्सना मिळते.
• प्रसाद मुळे, सायबर तज्ज्ञ..
यांनी तत्काळ 'नो' असा प्रतिसाद दिला. त्यानंतर त्यांच्या खात्यातून पैसे कपात झाले.
फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी दोन्ही बँक खाती गोठवली (फ्रीझ केली) आणि सायबर पोलिसांत धाव घेतली.
0 Response to "पैसे कपातीच्या मेसेजला 'नो' उत्तर दिले अन् बँकेच्या खात्यातून १.७० लाख गेले."
एक टिप्पणी भेजें