-->
कायदा हातात घेऊ नका; सण उत्सवात जातीय सलोखा जपा.

कायदा हातात घेऊ नका; सण उत्सवात जातीय सलोखा जपा.


अप्पर पोलीस अधीक्षक निलेश मोरे यांचे आवाहन.

       युगांतर बारसागडे 
"साप्ताहिक जनता की आवाज" 

साकोली :- येणारा काळ सणासुदीचा असून कृष्णजन्माष्टमी, पोळा, तान्हा पोळा, गणेशोत्सव, दुर्गा उत्सव, दिवाळी असे विविध सण येणार आहेत. अशा उत्सवांना काही समाजकंटक गालबोट लावण्याची शक्यता असते, त्यामुळे नागरिकांनी कोणत्याही परिस्थितीत कायदा हातात घेऊ नये आणि अशी परिस्थिती उद्भवल्यास तात्काळ पोलीस विभागाला माहिती द्यावी, असे आवाहन भंडारा जिल्ह्याचे अप्पर पोलीस अधीक्षक निलेश मोरे यांनी साकोली येथे आयोजित शांतता समितीच्या बैठकीत केले.
.           शांतता समिती चे बैठक वेळी फोटो 
      
        एक गाव एक मिरवणूक' ही संकल्पना.

भविष्यात वेगवेगळ्या समाजाचे सण येणार असल्याने जातीय सलोखा व सद्भावना कायम ठेवून एकमेकांच्या सणांमध्ये सहभागी झाले पाहिजे. मिरवणूक काढताना 'एक गाव एक गणपती' किंवा 'एक गाव एक मिरवणूक' ही

संकल्पना राबवावी, जेणेकरून समाजात वाद होणार नाहीत. रॅलीमध्ये काही समाजकंटक असतातच, त्यांच्याकडे लक्ष ठेवून गणेश आणि दुर्गा मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी रात्री जागून पोलीस विभागाशी संपर्कात राहावे आणि कोणतेही तंटे होणार नाहीत याची दक्षता घ्यावी, अशा सूचना त्यांनी दिल्या.

पोलीस विभाग दारू दुकानदारांवर लक्ष ठेवून असून तान्हा पोळ्याच्या दिवशी दारू मिळणार नाही याची खबरदारी

घेतली जाईल. कोणीही कायदा व सुव्यवस्था हातात घेऊ नये, गुन्हेगारांवर आम्ही वचक ठेवून आहोत, असेही मोरे म्हणाले.

या बैठकीला उपविभागीय अधिकारी स्वाती देसाई, उपविभागीय पोलीस अधिकारी शिवम विसापुरे, तहसीलदार संदीप कदम, नगराध्यक्षा देवश्री कापगते, साकोलीचे ठाणेदार महादेव आचरेकर, पालांदूरचे ठाणेदार मुंडे आदी मान्यवर उपस्थित होते.

हरवलेले मोबाईल व दागिने परत.

यावेळी पोलीस विभागाने चोरीस गेलेले मोबाईल हस्तगत करून मूळ मालकांना सभेतच परत केले. तसेच एका महिलेचे चोरी गेलेले दागिने एका दिवसात जप्त करून भर सभेत त्या महिलेच्या हाती देण्यात आले. यामुळे उपस्थितांनी पोलीस कार्याबद्दल समाधान व्यक्त केले.

कायदा व सुव्यवस्था बिघडू नये.- पो.उ.वि.अधिकारी 

पोलीस उपविभागीय अधिकारी शिवम विसापुरे म्हणाले, मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी दारू पिऊ नये. पोलीस विभागातर्फे काही ठिकाणी कॉर्नर मीटिंग घेण्यात येणार असून कायदा व सुव्यवस्था बिघडू नये यासाठी दक्षता घ्यावी. नगराध्यक्षा देवश्री कापगते यांनी डीजे मुळे विद्यार्थ्यांच्या अभ्यासात अडथळा येतो, याकडे लक्ष देणे.

गणेश उत्सवात समाज प्रबोधन करण्याची गरज.- रंगारी 

गरजेचे असल्याचे सांगितले. जिल्हा शांतता समितीचे सदस्य डी. जी. रंगारी यांनी गणेश मंडळांनी आठ दिवसांत जनप्रबोधन, रक्तदान, पाणी वाचवा, अंधश्रद्धा निर्मूलन आणि लहान मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी सांस्कृतिक कार्यक्रम घ्यावेत, अशी सूचना केली. शब्बीर पठाण यांनी जातीय सलोखा टिकवून ठेवण्याचे आवाहन केले. प्रबोधनकार भावेश कोटांगले यांनी प्रबोधनात्मक कार्यक्रमांवर भर द्यावा असे सांगितले. सरपंच पूजा देशमुख, प्रा. युवराज खोब्रागडे व इतर मंडळ कार्यकर्त्यांनीही मार्गदर्शन केले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक ठाणेदार महादेव आचरेकर यांनी केले तर आभार लाखनीचे ठाणेदार आशिष गजभिये यांनी मानले. यावेळी पत्रकार राजेश बैस, कार्तिक मेश्राम, शीतल नागदेवे, पोलीस पाटील व गणेश मंडळ पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

0 Response to "कायदा हातात घेऊ नका; सण उत्सवात जातीय सलोखा जपा."

एक टिप्पणी भेजें

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article