कुस्ती खेळाडूंनी विभागात जिल्ह्याचे नाव लौकीक करावे - सीईओ हरिष मदान.
सोमवार, 21 सितंबर 2026
Comment
संजीव भांबोरे
"साप्ताहिक जनता की आवाज"
भंडारा :- शारीरिक तंदुरुस्ती शिवाय जीवनाच्या कोणत्याही क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी बजावता येणार नाही. त्याकरिता शरीर, मन बळकट असणे आवश्यक आहे. तसेच ऑलम्पिक वीर खाशाबा जाधव यांच्या कार्याचा गौरव व्हावा व उदयोन्मुख खेळाडूंना प्रोत्साहन आणि त्यांच्या कार्यापासून प्रेरणा मिळावी. त्याकरिता कुस्ती खेळाडूंनी जिद्द, चिकाटी व आत्मविश्वास बाळगून आई-वडिल, गुरुजन तसेच विभागात (राज्यात) व जिल्ह्याचे नाव लौकीक करावे असे प्रतिपादन दी भंडारा अर्बन को- ऑपरेटिव्ह बँकचे मुख्य कार्यकारी अधिकारी हरिष मदान यांनी केले.
ते छत्रपती शिवाजी महाराज क्रिडा संकुलनातील बॅटमिंटन हॉल येथे क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत जिल्हा क्रिडा परिषद, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय भंडाराच्या वतीने आयोजित तालुकास्तरिय शालेय कुस्ती स्पर्धेचे उद्घाटन करतांना बोलत होते.
सदर तालुका स्तरीय कुस्ती स्पर्धा जिल्हा क्रीडा अधिकारी लतिका लेकुरवाळे, क्रीडा अधिकारी निखिलेश तभाने व तालुका क्रीडा संयोजक बेनिलाल चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आली.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी क्रीडा परिषदेचे सदस्य अरुण बांडेबुचे होते. उद्घाटन दी भंडारा अर्बन को- ऑपरेटिव्ह बँकचे मुख्य कार्यकारी अधिकारी हरिष मदान यांच्या हस्ते करण्यात आले. प्रमुख पाहुणे म्हणुन तांत्रिक अधिकारी कुणाल वडिचार, कुस्ती पंच अशोक बन्सोड, कुस्ती मार्गदर्शक विलास केजरकर, गोपाल सेलोकर,
इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
त्यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते कुस्ती मॅटचे पुजन करून कार्यक्रमाची सुरूवात करण्यात आली. उपस्थित मान्यवरांचे शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन स्वागत व सत्कार करण्यात आले. उद्घाटनीय सामना प्रियंका सचिन पाटील विरुद्ध सोनल विष्णू पंचबुध्दे यांच्या करण्यात आला.
त्याप्रसंगी प्रत्येक शालेय विद्यार्थ्यांनी प्रत्येक खेळामध्ये हिरहिरीने भाग घेवून महाविद्यालयासह आपल्या आई-वडिल व गुरूजनांचे नाव उज्वल करावे असा संदेश जिल्हा क्रीडा परिषदेचे सदस्य अरुण बांडेबुचे यांनी दिला.
१४ वयोगटातील मुली समृध्दी यशवंत मेश्राम-३६ किलो, स्वरूपा विष्णु मदनकर -३९ किलो, पूर्वी मुन्ना मांढरे -४२ किलो, मानवता नरेश ईश्वरकर- ४६ किलो, १७ वयोगटात झनक प्रशांत शहारे- ४३ किलो, अक्षरा कपूरचंद मने- ४६ किलो, श्रध्दा सुभाष लुटे - ४९ किलो, सोनल विष्णू पंचबुध्दे -५३ किलो, पुजा राजकुमार समरित-५७ किलो, प्रियंका सचिन पाटील -६१ किलो, १९ वर्षीय वयोगटात आर्या मुन्ना सार्वे -५५ किलो वयोगटात यांनी अनुक्रमे प्रथम क्रमांक पटकाविला आहे.
१४ वयोगटातील मुले प्रतिक राजू चामट - ३५ किलो, आयुष तुळशीदास चवळे ३८ किलो, सारंग बापुरंगा लुटे -४८ किलो , १७ वयोगटात ४५ किलो नैतिक गोपीचंद थुळसे- ४५ किलो, पवन बापुरंगा लुटे -४८ किलो, अमन तुळशीदास चवळे - ५१ किलो, भगवान धनराज कहालकर-५५ किलो, पार्थ भगवान लांजेवार - ६५ किलो, तन्मय ललित मते- ८० किलो, १९ वयोगटात सात्विक हरिगोपाल सोनसरे -५७ किलो, तुषार सुरेंद्र सार्वे- ७९ किलो, व १९ वयोगटात (ग्रिकोरोमन) गौरव हरिश्चंद्र गिरीपुंजे- ८४ किलोगटात अनुक्रमे प्रथम क्रमांक पटकाविला आहे.
त्यावेळी पंच म्हणून अशोक बन्सोड व निखिल चौधरी, वेळाधिकारी मयुर चौधरी, साईडपंच म्हणून विलास केजरकर व तांत्रिक अधिकारी कुणाल वडिचार यांनी आपली योग्य भुमिका पार पाडली.
कार्यक्रमा दरम्यान तालुक्यातील क्रीडा मार्गदर्शक, क्रीडा शिक्षक, क्रीडा कार्यकर्ता, नागरिक, क्रीडा प्रेमी तसेच खेळाडू विद्यार्थी -विद्यार्थ्यींनींनी सहभागी झाल्या होत्या.
मान्यवरांनी तालुक्यातील सर्व विजयी कुस्ती खेळाडू विद्यार्थी- विद्यार्थिनींनीना बुधवार दिनांक २३ सप्टेंबर २०२६ ला तालुका क्रीडा संकुल तुमसर येथे जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेकरिता शुभेच्छा दिल्या व पराजित खेळाडूंना खचून न जाता पुन्हा प्रयत्न करावे असे आवाहन करण्यात आले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रास्ताविक कुस्ती मार्गदर्शक विलास केजरकर यांनी केले. तर उपस्थितांचे आभार अशोक बन्सोड यांनी मानले.
कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी राहुल पाठक, राजेंद्र हेडाऊ, अलिप्त कुमार बन्सोड, विशाल टेंभुरकर, रामदास पडोळे, सुनिल मेश्राम, निलीमा मांढरे, अतुल गजभिये, रामभाऊ धुळसे, कुस्ती खेळाडू विद्यार्थीनी- विद्यार्थ्यांनी, क्रीडा शिक्षक, मार्गदर्शक, पालक वर्ग तसेच जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय भंडारा, संघटनेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी सहकार्य केले.
0 Response to "कुस्ती खेळाडूंनी विभागात जिल्ह्याचे नाव लौकीक करावे - सीईओ हरिष मदान."
एक टिप्पणी भेजें