-->
दीक्षाभूमी येथील प्रस्तावित प्रकल्पाच्या आराखड्याचे आढावा बैठक.

दीक्षाभूमी येथील प्रस्तावित प्रकल्पाच्या आराखड्याचे आढावा बैठक.



            प्रदिप कडबे 
"साप्ताहिक जनता की आवाज" 

नागपूर :- जिल्हा नियोजन भवन, नागपूर दीक्षाभूमी येथील प्रस्तावित प्रकल्पाच्या आराखड्याचे सादरीकरण पाहून त्याचा आढावा घेतला. 
यावेळी उपस्थित मान्यवरांच्या सूचना जाणून घेत संबंधित अधिकाऱ्यांशी प्रकल्पाच्या विविध बाबींवर चर्चा केली व आवश्यक सूचना दिल्या.

यावेळी महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री व नागपूरचे पालकमंत्री मा. चंद्रशेखर बावनकुळेजी, खा. श्यामकुमार बर्वे जी, आ. डॉ. नितीन राऊत जी, दीक्षाभूमी स्मारक समितीचे अध्यक्ष भंते सुरेई ससाईजी, नागपूर सुधार प्रन्यासचे आयुक्त संजय मीना, समाज कल्याण विभागाचे प्रादेशिक उपायुक्त प्रसाद कुलकर्णी, सहाय्यक आयुक्त सुकेशिनी तेलगोटे, विलास गजघाटे तसेच इतर मान्यवर नागरिक व संबंधित अधिकारी उपस्थित होते.

दीक्षाभूमीच्या प्रस्तावित विकासकामांना योग्य दिशा देण्यासाठी सकारात्मक चर्चा झाली.

0 Response to "दीक्षाभूमी येथील प्रस्तावित प्रकल्पाच्या आराखड्याचे आढावा बैठक."

एक टिप्पणी भेजें

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article