देव दगडात नसून माणसाच्या सेवेत" -ह.भ.प. गजानन महाराज दिघडे.
मंगलवार, 22 सितंबर 2026
Comment
• “मुलामुलींना द्यावे शिक्षण, जेणे गावाचे वाढेल भूषण'.
नागपूर विभाग प्रतिनिधी
प्रदीप कडबे
साप्ताहिक "जनता की आवाज"
वर्धा, दि २२ सप्टेंबर :- आर्वी तालुक्यातील बाजारवाडा येथे समाजप्रबोधनाचा कार्यक्रम उत्साहात पार पडला. यावेळी ह.भ.प. गजानन महाराज दिघडे यांनी संत गाडगेबाबांच्या विचारांवर प्रकाश टाकत, "तीर्थी धोंडापाणी, देव रोकडा सज्जनी; देव दगडात नसून माणसाच्या सेवेत आहे," असा संदेश दिला. कार्यक्रमाला गावातील असंख्य नागरिक उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महेश चौधरी यांनी केले. कीर्तनकार ह.भ.प.गजानन महाराज दिघडे यांचे स्वागत गुरुदेव सेवक राजूभाऊ चौधरी यांनी केले.हार्मोनियम वादक नितीनजी
कुबडे, तबला वादक दिनकरराव राऊत, सुधीर इंगळे, गोपालभाऊ ठाकूर व वाहनचालक इंगोले भाऊ यांचेही मान्यवरांच्या हस्ते स्वागत करण्यात आले.
कीर्तनातून महाराजांनी संत गाडगेबाबांच्या समाजकार्याची माहिती दिली. अज्ञान, अंधश्रद्धा, अनिष्ट रूढी-परंपरा, जातिभेद व अस्पृश्यता दूर करण्यासाठी गाडगेबाबांनी संपूर्ण आयुष्य समाजप्रबोधनासाठी समर्पित केले.चोरी करू नका,
सावकाराकडून कर्ज घेऊ नका, व्यसनांपासून दूर राहा, प्राण्यांची हत्या करू नका आणि अंधश्रद्धेला बळी पडू नका, असा संदेश ते देत असत. गाडगेबाबांनी लोकांनी दिलेल्या देणग्यांतून धर्मशाळा, अनाथालये, आश्रम व विद्यालये उभारून दीन-दुबळ्यांची सेवा केली. संत तुकाराम महाराजांना गुरू मानणारे गाडगेबाबा ग्रामीण वऱ्हाडी भाषेतून लोकांना सहज समजेल अशा पद्धतीने प्रबोधन करत असत.यावेळी "मुलामुलींना द्यावे शिक्षण, जेणे गावाचे वाढेल भूषण," असे आवाहनही महाराजांनी केले.
नरेंद्रजी चौधरी यांनी उपस्थित पाहुणे कार्यक्रमाच्या शेवटी ग्रामस्थांचे आभार मानले.
0 Response to "देव दगडात नसून माणसाच्या सेवेत" -ह.भ.प. गजानन महाराज दिघडे."
एक टिप्पणी भेजें