-->
अखिल भारतीय ध्रुवतारा अपंग क्रांतिकारी सामाजिक संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष संजीव भांबोरे यांच्या सत्कार.

अखिल भारतीय ध्रुवतारा अपंग क्रांतिकारी सामाजिक संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष संजीव भांबोरे यांच्या सत्कार.




• राष्ट्रीय अध्यक्ष व जेष्ठ पत्रकार संजीव भांबोरे यांचा साप्ताहिक "जनता की आवाज" या वृत्तपत्रा समूहा कडून सत्कार. 
         जिल्हा प्रतिनिधी 
साप्ताहिक "जनता की आवाज"

भंडारा/तुमसर :- अखिल भारतीय ध्रुवतारा अपंग क्रांतिकारी सामाजिक संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष व जेष्ठ पत्रकार संजीव भांबोरे साहेब यांचा हस्ते भंडारा जिल्हयातील पत्रकारितेत रुची असलेल्या युवा वर्गाला व्यासपीठ मिळण्याच्या दृष्टिकोनातून "युवा प्रतिनिधी संकल्प" कार्यक्रम घेण्यात आला.या कार्यक्रमात अनेक युवा वर्गानां "साप्ताहिक"जनता की आवाज" चे प्रशिक्षित युवा प्रतिनित्व देण्यात आले.
तसेच वृत्तपत्र समूहाला अधिक श्रेष्ठ उत्तम प्रकारचे विविध प्रकारचे वृत्त संकलनाची बातमी सर्वात जास्त प्रमाणात सहकार्य केल्याबद्दल व विविध संघटना च्या वतीने पत्रकार,दिव्यांग,प्रबोधनकार सामाजिक,व ग्रामीण भागात समस्या प्रसार माध्यमातून पोहचवण्याचे कार्याची दखल घेऊन सामाजिक कार्यकर्ते व जेष्ठ पत्रकार संजीव मुरारी भांबोरे यांचा शाल ,श्रीफळ ,पुष्पगुच्छ देऊन समाजसेवक मुख्य संपादक श्रीकृष्ण देशभ्रतार यांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला.

तसेच युवा प्रतिनिधींना संजीव भांबोरे यांनी आजचा युवक व पत्रकार या विषयावर मार्गदर्शन केले.कार्यक्रमाचे संचालन व आभार सौ.मंजूषा देशभ्रतार यांनी केले.उपस्थितीत तिलक सोनेकर, दिलीप बुरडे, एन.एम.शेंडे, विजय बागडे, हर्षवर्धन देशभ्रतार, एन.चव्हाण संघवर्धन देशभ्रतार, व अनेक युवा वर्ग महीला व पुरुष पत्रकार उपस्थित होते.

0 Response to "अखिल भारतीय ध्रुवतारा अपंग क्रांतिकारी सामाजिक संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष संजीव भांबोरे यांच्या सत्कार. "

एक टिप्पणी भेजें

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article