जिल्हास्तरीय ज्युदो स्पर्धेत सेंट अॅन्सच्या विद्यार्थ्यांची उल्लेखनीय कामगिरी हर्ष बसोलेची विभागीयस्तरासाठी निवड..
मंगलवार, 22 सितंबर 2026
Comment
नागपूर विभाग प्रतिनिधी
प्रदीप कडबे,
साप्ताहिक "जनता की आवाज"
नागपूर :- क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्या अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, नागपूर यांच्या वतीने आयोजित जिल्हास्तरीय शालेय ज्युदो स्पर्धा २०२६-२७ विभागीय क्रीडा संकुल, नागपूर येथे पार पडली.
या स्पर्धेत सेंट अॅन्स इंग्लिश मीडियम स्कूल, दहेगाव (रं.), ता. सावनेर, जि. नागपूरच्या विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट कामगिरी करत एकूण पाच पदकांची कमाई केली. हर्ष बसोले याने सुवर्णपदक पटकावले असून, त्याची आगामी विभागीयस्तरीय ज्युदो स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
भूपेश गोरे याने रौप्यपदक, तर शौर्य सहारे, रुद्र काटोरे आणि एंजल अंदासकर यांनी कांस्यपदक मिळविले. विद्यार्थ्यांनी स्पर्धेत उत्कृष्ट कौशल्य, शिस्त आणि जिद्दीचे प्रदर्शन केले.
हर्ष बसोलेच्या विभागीयस्तरीय स्पर्धेसाठी झालेल्या निवडीबद्दल तसेच सर्व पदकविजेत्या विद्यार्थ्यांचे शाळेच्या मुख्याध्यापिका सिस्टर क्लिओफास, कॉरस्पॉन्डंट सिस्टर सिरिया पुष्पम, शिक्षकवृंद आणि क्रीडा विभागाच्या वतीने अभिनंदन करण्यात आले.
0 Response to "जिल्हास्तरीय ज्युदो स्पर्धेत सेंट अॅन्सच्या विद्यार्थ्यांची उल्लेखनीय कामगिरी हर्ष बसोलेची विभागीयस्तरासाठी निवड.."
एक टिप्पणी भेजें