-->
शांततेत उत्साह हाच खरा सण - एसपी नुरूल हसन.

शांततेत उत्साह हाच खरा सण - एसपी नुरूल हसन.


• साकोलीच्या शांतता समिती बैठकीत प्रतिपादन • पोलीस ठाणे साकोली येथे  आयोजन.

            संजीव भांबोरे 
"साप्ताहिक जनता की आवाज"

भंडारा :- सण उत्सवात शांतता व सुव्यवस्था राखून उत्साह दाखविणे हाच खरा सण साजरा होतो. दरम्यान "देशभक्ती जनसेवा" या ब्रिद वाक्या सोबतच विविध उपक्रमांनी हा १२ दिवसीय श्री गणेशोत्सव अगदी उत्साहाने साजरा करा पण नियमांचे पालन करूनच" असे प्रतिपादन जिल्हा पोलीस अधिक्षक नुरूल हसन यांनी साकोलीत केले.  ला पोलीस ठाणे साकोली आयोजित श्री गणेशोत्सव सणानिमित्त शांतता समितीची बैठक सभागृहात संपन्न झाली. 

 या बैठकीला प्रामुख्याने जिल्हा पोलीस अधिक्षक नुरूल हसन, उपविभागीय पोलीस अधिकारी शिवम विसापूरे, साकोली पोलीस निरीक्षक महादेव आचरेकर व नगरपरिषद उपाध्यक्ष रोहिणी मुंगूलमारे हे उपस्थित होते.

प्रसंगी उपविभागीय पोलीस अधिकारी शिवम विसापूरे यांनी सांगितले की, प्रथम साकोलीच्या संकल्पनेतून साकारलेली "आरोपी दत्तक योजना" ही योजना संपूर्ण भंडारा जिल्ह्यात राबविण्यात येणार असल्याची माहिती आहे. व यावर्षी "मोरया अवार्ड" माध्यमातून श्री गणेश मंडळांना पारितोषिके देण्यात येतील. यात प्रथम २५ हजार असे तीन पुरस्कार देण्यात येणार. यामध्ये विविध जनजागृती, महिला सुरक्षा, सायबर क्राईम जनजागृती असे विविध देखावे व प्रसारणांचा समावेश आहे. एस पी नुरूल हसन म्हणाले की, प्रत्येक सण उत्सव काळात शांतता व सुव्यवस्था कायम करा. आणि नशामुक्त संकल्पना, विविध प्रकारचे उपक्रम, युवा विद्यार्थ्यांना जागरूकतेचे कार्यक्रम व देखावे साकारणे, सोशल मिडीयातून आक्षेपार्ह फोटो व्हिडिओ टाकू नये, मंडळ परीसरात मद्यपान व धूम्रपान करू नका जेणेकरून सामाजिक एकतेला ठेच पोहचेल असे आढळून आल्यास तातडीने गंभीर गुन्हा दाखल करण्यात यावा अश्या पोलीस कर्मचाऱ्यांना सुद्धा सुचना दिल्या. नगरपरिषद उपाध्यक्ष रोहिणी मुंगूलमारे म्हणाले की, साकोली सेंदूरवाफा शहरात जनतेने शांततापूर्ण सण उत्सव साजरे करा. जातीय तेढ निर्माण करू नये. आपली साकोली ही श्री संत लहरीबाबा मठ देवस्थानची पवित्र भूमि आहे आणि येथे एकोप्याने प्रत्येक सण साजरा होतो.

या प्रसंगी पत्रकार व सामाजिक कार्य डी जी रंगारी, शब्बीर पठाण,भावेश कोटंगले  यांनीही मार्गदर्शन केले 
या बैठकीला संचालन करीत पोलीस निरीक्षक एम. पी. आचरेकर यांनी सांगितले की, शहरात व तालुक्यात विविध श्री गणेश स्थापना मंडळांना भेटी दिल्यात, यात कॉर्नर सभा घेत सर्व आढावा तयार असून हा पोळा उत्सव व १२ दिवसीय श्री गणेशोत्सव साजरा करण्यासाठी साकोली पोलीस प्रशासन सज्ज झाले आहे असे ते म्हणाले. 

 या साकोली तालुका शांतता समितीच्या बैठकीला पाथरीच्या सरपंच पूजा देशमुख, सावरबंद सरपंच माधवी बडवाईक, पोलीस पाटील शंकर कापगते, साकोली श्री बाल गणेश उत्सव मंडळाचे आशिष चेडगे, प्रज्वल रोकडे, मोहीत आगाशे, सावन चौबे, पोलीस पाटील जयंत बडवाईक,नगरसेवक नयन पटेल, नगरसेविका मेघा बडवाईक, मुन्ना पठाण, शमिम अन्सारी, आशा शेंडे, डी. जी. रंगारी, शब्बीर पठाण, भावेश कोटांगले, भिमावती पटले, शितल नागदेवे, तनुजा नागदेवे, इमरान पठाण, सलमान पठाण यांसह तालुक्यातील सर्व गणेश मंडळे, विविध पदाधिकारी, ग्रामपंचायत सदस्यगण तथा महिला पुरुष नागरिक उपस्थित होते.

0 Response to "शांततेत उत्साह हाच खरा सण - एसपी नुरूल हसन."

एक टिप्पणी भेजें

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article