-->
"श्रावण" महिनाण्याच अखेरीस सण.."बैलपोळा" व "तान्हा पोळा"..

"श्रावण" महिनाण्याच अखेरीस सण.."बैलपोळा" व "तान्हा पोळा"..



संकलन/संग्रहक :- हर्षवर्धन देशभ्रतार 

महिन्यात सणांची श्रसलपेल पहायला मिळते. अनेक सण या महिन्यात आपल्या भेटीला येतात. पावसाचे दिवस असल्याने सृष्टी आधीच हिरवाईचा शालू नेसून नव्या नवरीवानी सजलेली असते. संपूर्ण वातावरणात एक प्रकारचा गारवा पसरल्याने मानवी मन देखील ताजे तवाने झालेले असते. अशा या श्रावण महिन्यात आपण नागपंचमी, नारळी पौर्णिमा, रक्षाबंधन, गोकुळाष्टमी यांसारखे सण साजरे करतो. आणि या श्रवण महिन्याची सांगता होते ती श्रवण महिन्याच्या अखेरीस येणाऱ्या पोळा या सणाने। तो बैलपोळा व तान्हापोळा असा दोन दिवसांचा असतो. पोळ्याची गाणी झडत्यांमुळे सानाचोरांचे खुप मनोरंजन होते-


पोया रे पोया, बैलांचा पोया।

तुरीच्या दावीने, मारला हो डोया।। कांद्याने आमचे, केले हो वदि। ऊसवाला बाप, ढसा दसा रहे।। एक नमन गौरा पार्बती; हर बोला,

बैलपोळा : बैलांना सन्मानाचे आमंत्रण!

हर हर महादेव..!

श्रवण अमावस्येला अर्थात पिठोरी अमावस्येला शेतकरी बांधव आपल्या सर्जा-राजाचा हा सण अत्यंत आनंदाने आणि उत्साहाने साजरा करतांना आपल्याला दिसतात. पुणे मुंबई यांसारखी मेट्रो शहरे या सणाविषयी कदाचीत अनभिज्ञ असावीत, एवढी ती वाढली आहेत.

 या शहरांची धावपळ पाहिली, की पोळा या सणाची यांना काही माहिती आहे की नाही, असे वाटते. परंतु या शहराच्या आसपासची गावे आणि संपूर्ण महाराष्ट्रात बळीराजा मात्र आपल्या जिवाभावाच्या सोबत्याचा हा सण अत्यंत पारंपारिक पध्दतीने आजही साजरा करतांना दिसतो. 
पौळा या सणाच्या आदल्या दिवशी बैलांना रितसर आमंत्रण देण्याची पध्दत आहे बरं का? शेतकरी प्रेमाने बैलांना म्हणतो, की आज आवतन घ्या; उद्या जेवायला या। वरून इझडती हाक

वाटी रे वाटी खोबऱ्याची वाटी महादेव रहे दोन पैश्यासाठी!. 

पार्वतीच्या लुगडयाले छप्पन गाठी देव कवा धावल
 गरिबांसाठी? एक नमन गौरा पर्वती; हर बोला, हर हर महादेव..!

असे आमंत्रण या बैलांना दिले जाते. दुसऱ्या दिवशी सकाळी बैलांना नदीवर नेले जाते, त्यांना झकास अंघोळ घालण्यात येते. घरी आणल्यावर त्यांच्या सर्वांगावर गेरूचे ठिपके रंग रंगोली दिले जातात. शिंगाना

आरसे, चवारे, बेगड, डोक्याला बाशिंग, गळ्यात कवड्या व घुंगरांच्या माळा घातल्या जातात, पायांमध्ये चांदीचे किंवा करदोडधाचे तोडे घालतात. नवी वेसण नवा कासरा घातल्यानंतर अंगावर रेशमी नक्षीकाम केलेली झूल पांघरली जाते. कैलासातील महादेवाच्या नंदीलाही लाजवेल, अशी बैलजोडी श्रृंगारली जाते. जनावरांचा गोठा स्वच्छ करण्यात येतो. घरातील सुवासीनी बैलांची विधीवत पूजा

करतात. बैलांकडून पोळ्याच्या दिवशी कोणतेही काम करून घेतले जात नाही. गोडधोड, पुरणपोळीचा घास त्यांना भरवला जातो. बैलांची कायम निगा राखणाऱ्या बलक्याला गडवाला नवे कपडे दिले जातात. बालपणी आपण त्यांच्या सजण्याचे वर्णन कवितेतून वाचत होतो-
शिंगे रंगविली, बाशिंगे बांधली! चढविल्या झूली, ऐनेदार !!

बैलांचे जेवण झाल्यानंतर सायंकाळी त्यांना गावाबाहेर मंदिरात नेले जाते. सर्व शेतकरी आपापल्या जोडधा घेऊन असल्यास मारुतीच्या मंदिराजवळ किंवा एका ठिकाणी एकत्र येतात. आंब्याच्या पानांचे तोरण बांधून बैलांना रांगेत उभे करण्यात येते. ढोल, ताशे, नगारे आदी वाद्य वाजवले जातात. झहत्या पोळ्याची गाणी म्हटली जातात. येथे बैलांच्या शर्यती देखील आयोजित केल्या जातात. ज्याच्या जोडीला सर्वात चांगले तयार केले वा सजवले असेल, त्या जोडीला

पारितोषीक दिले जाते. आपापल्या गावातील परंपरेनुसार उत्सव साजरा झाल्यानंतर किंवा पोळा फुटल्यानंतर कार्यक्रम संपन्न होतो. घरी निधतांना बैलांना घरोघरी नेल्या जाते. तेथे आयाबाया बैलांची पूजा करतात. बैल नेणान्यास बोजारा-पैसे देण्याची प्रथा रुढ आहे. हिंदू संस्कृतीत वृक्षांप्रमाणेच वन्यजिवांना देखील पुजनीय मानल्या जाते. झडती खुणावते..

पोळा रे पोळा, पाऊस झाला भोळा! शेतकरी हीतासाठी, सगळे व्हा गोळा! एक नमन गौरा पर्वती; हर बोला, हर हर महादेव..!!

वर्षभर शेतात शेतकऱ्याासमवेत बरोबरीने राबणाऱ्या बैलांप्रती एक दिवस उतराई होण्याची संधी म्हणून पोळा या सणाकडे आपण पाहातो. पूर्वापार चालत आलेल्या रूढी परंपरांप्रमाणे हे उत्सव आजही गावागावांमधून उत्साहात साजरे होतांना आपल्याला दिसतात.

0 Response to ""श्रावण" महिनाण्याच अखेरीस सण.."बैलपोळा" व "तान्हा पोळा".."

एक टिप्पणी भेजें

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article