-->
पर्यावरण संवर्धनातील योगदानाची राष्ट्रीय पातळीवर दखल.

पर्यावरण संवर्धनातील योगदानाची राष्ट्रीय पातळीवर दखल.




• प्रा. डॉ. बी. एन. खरात यांना ‘राष्ट्रीय पर्यावरण भूषण पुरस्कार’.
 
नागपूर विभागीय विशेष प्रतिनिधी
          प्रदीप कडबे 
"साप्ताहिक जनता की आवाज" 

रामटेक/नांदेड :- मातोश्री लक्ष्मीबाई ठाकूर तसेच मायडी बहुउद्देशीय सेवाभावी संस्था नांदेड महाराष्ट्र यांच्या संयुक्त विद्यमानाने घेण्यात आलेल्या राष्ट्रीय समता पुरस्कार 2026 
 या कार्यक्रमात प्रा.डॉ. बी. एन. खरात (सिंधुदुर्ग) यांना "राष्ट्रीय पर्यावरण भूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
 हा कार्यक्रम नांदेड येथे अतिथी हॉटेल मध्ये मोठ्या उत्साहात पार पडला.या कार्यक्रमाला भारत वानखेडे मॅको बँक मंत्रालय मुंबई ,अंबादास चंदनशिवे, सचिव मुंबई ,ॲड. विजय गणोरकर तसेच विशेष अतिथी म्हणून भदंत पयाबोधी थेरो श्रामनेर भिक्कू संघ , संत बाबा सुखविंदर सिंग गुरुद्वारा संचालक, मुक्ती मोहम्मद आयुब कासमी. या तीन धर्म गुरूच्या उपस्थितीत मोठ्या सन्मानाने हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. या संपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन मारुती शिकारे, आणि शंकरसिंह ठाकूर यांनी केले.
समाजसेवेची व्रत घेतलेले सिंधुदुर्ग येथील डॉ..खरात यांनी पर्यावरण संवर्धन, निसर्ग अभ्यास, जैवविविधता, निसर्गोपचार, वनौषधी, सामाजिक व शैक्षणिक कार्य, ऐतिहासिक किल्ले व पर्यटन संशोधन तसेच पत्रकारिता अशा विविध क्षेत्रांत सातत्याने कार्य केले .त्यांच्या बहुआयामी कार्याची दखल घेत हा सन्मान देण्यात आल्याने त्यांच्या कार्याचे विविध स्तरांतून कौतुक होत आहे.

डॉ. खरात यांनी गेल्या २५ वर्षांपासून पर्यावरण आणि निसर्ग संवर्धनासाठी विविध उपक्रम राबविले आहेत. वनौषधी, वनस्पती, पक्षी, जैवविविधता आणि निसर्गातील विविध घटकांचा अभ्यास व निरीक्षण करून त्यांचे जतन आणि संवर्धन करण्यासाठी ते सातत्याने प्रयत्नशील आहेत. उन्हाळ्यात पक्ष्यांना पाण्याची उपलब्धता व्हावी यासाठी सुमारे ५ हजार पक्ष्यांसाठी पाण्याची व्यवस्था करण्याबरोबरच पक्ष्यांना सुरक्षित निवारा व घरटी उपलब्ध करून देण्याचे उपक्रमही त्यांनी राबविले आहेत.
महाराष्ट्राच्या ऐतिहासिक वारशाबद्दल विशेष आस्था असलेल्या डॉ. खरात यांनी राज्यातील विविध किल्ल्यांचा ऐतिहासिक, भौगोलिक, पर्यटनात्मक आणि संवर्धनात्मक दृष्टिकोनातून अभ्यास केला आहे. किल्ले पर्यटनाच्या माध्यमातून ऐतिहासिक वारसा आणि स्थानिक पर्यटनाला चालना देण्याच्या दृष्टीने त्यांनी कार्य केले आहे.
निसर्गोपचार व योग क्षेत्रातही त्यांचे योगदान उल्लेखनीय आहे. त्यांनी अमरावती विद्यापीठाचा D.N.Y.T. (Diploma in Naturopathy and Yogic Therapy) अभ्यासक्रम पूर्ण केला असून योग, निसर्गोपचार, आरोग्य आणि संतुलित जीवनशैलीविषयी जनजागृती करण्यासाठी विविध उपक्रमांत सहभाग घेतला आहे. भारतीय युवा नेतृत्व परिषदेमध्ये ‘Council Member of Yoga’ म्हणूनही त्यांनी जबाबदारी पार पाडली आहे.
सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात भटके-विमुक्त, वंचित आणि उपेक्षित घटकांतील मुलांना शिक्षणाच्या प्रवाहाशी जोडण्यासाठी त्यांनी काम केले आहे. शिक्षणाच्या माध्यमातून सामाजिक परिवर्तन घडविण्याच्या भूमिकेतून ते विविध उपक्रमांत सक्रिय राहिले आहेत.ज्येष्ठ नागरिकांच्या सेवेसाठी कार्यरत असलेल्या विसावा सोशल वृद्धाश्रम’च्या माध्यमातून ते सुमारे १५ वर्षांपासून संचालक म्हणून कार्यरत आहेत. ज्येष्ठ नागरिकांना आधार, सुरक्षित निवारा, सन्मान आणि आत्मीयता मिळावी यासाठी त्यांच्या कार्याचा मोठा वाटा आहे.
पत्रकारिता क्षेत्रातही त्यांनी सक्रिय योगदान दिले असून महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ, सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष म्हणून जबाबदारी सांभाळली आहे. पर्यावरण, सामाजिक प्रश्न, शिक्षण, पर्यटन, संस्कृती आणि समाजहिताच्या विषयांना माध्यमांद्वारे व्यासपीठ मिळवून देण्यासाठी ते कार्यरत आहेत.
सामाजिक व पर्यावरणीय क्षेत्रातील विविध उपक्रमांमध्ये अण्णा हजारे, सिंधुताई सपकाळ, पद्मविभूषण डॉ. प्रकाश आमटे आणि पद्मश्री डॉ. रवींद्र कोल्हे यांच्यासह विविध क्षेत्रांतील १०० हून अधिक मान्यवरांसोबत कार्य करण्याची संधी त्यांना मिळाली आहे. त्यांच्या सामाजिक व युवकाभिमुख कार्याची दखल घेत त्यांना महाराष्ट्र शासनाचा आदर्श युवक पुरस्कार’ही प्राप्त झाला आहे.
पर्यावरण संवर्धनापासून सामाजिक सेवेसह शिक्षण, निसर्गोपचार, जैवविविधता, इतिहास, पर्यटन आणि पत्रकारिता अशा विविध क्षेत्रांत कार्यरत असलेल्या प्रा. डॉ. बी. एन. खरात यांच्या कार्याचा ‘राष्ट्रीय पर्यावरण भूषण पुरस्कार’ हा गौरव त्यांच्या बहुआयामी सामाजिक योगदानाची दखल घेणारा ठरला आहे. या पुरस्काराबद्दल सर्वत्र प्रा.डॉ. बी एन. खरात यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

0 Response to "पर्यावरण संवर्धनातील योगदानाची राष्ट्रीय पातळीवर दखल."

एक टिप्पणी भेजें

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article