इटियाडोह धरण ओवरफ्लो.
शनिवार, 26 सितंबर 2026
Comment
• नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा; शेतकऱ्यांना मोठा दिलासा.
युगांतर बारसागडे
साप्ताहिक "जनता की आवाज"
अर्जुनी मोरगाव/गोंदिया दि. २६ :- जिल्ह्यातील अर्जुनी मोरगाव तालुक्यांचे वैभव आणि जिल्ह्यातील प्रमुख मोठ्या प्रकल्पांपैकी एक असलेले इटियाडोह धरण आज शनिवार, दि. २६ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी ६ वाजताच्या सुमारास १०० टक्के भरून ओव्हरफ्लो झाले. मागील आँगस्ट तसेच या सप्टेंबर महिन्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे धरणाच्या पाणीपातळीत झपाटयाने वाढ झाली.
शेतकऱ्यांची चिंता मिटली..
इटियाडोह धरण गोंदिया, भंडारा आणि गडचिरोली जिल्ह्यांतील शेतकन्यांसाठी महत्वाचा सिंचन प्रकल्प मानला जातो. धरण पूर्ण क्षमतेने भरल्यामुळे आगामी रब्बी हंगामासह सिंचनासाठी आवश्यक पाण्याची उपलव्धता वाढणार असून, शेतकन्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. पिण्याच्या पाण्याच्या उपलव्धतेलाही यामुळे आधार मिळणार आहे.
नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा...
धरण ओव्हरफ्लो झाल्यानंतर गाढवी नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. नागरिकांनी सुरक्षिततेच्या दृष्टिने नदीपात्रात उतरू नये तसेच पाण्याच्या प्रवाहाजवळ जाणे टाळावे, असे आवाहन करण्यात आले आहे. प्रशासन व सिंचन विभागाच्या सूचनांचे पालन करण्यांचे आवाहन
निसर्गसौंदर्य पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी..
इटियाडोह धरण ओव्हरफ्लो होणे हे दरवर्षी पर्यटकांसाठी आकर्षणांचे केंद्र ठरते. डोंगररांगांच्या कुशीत असलेल्या धरणातून वाहणान्या पाण्यांचे विहंगम दृश्य पाहण्यासाठी महाराष्ट्रासह मध्य प्रदेश व छतीसगढमधूनही पर्यटक येथे दाखल होतात. शनिवार-रविवारच्या सुट्टीमुळे पर्यटकांची गर्दी वाढण्याची शक्यता आहे.
पारंपरिक पद्धतीने जलपूजन.
धरण ओव्हरफ्लो झाल्यानंतर दरवर्षीप्रमाणे यंदाही लोकप्रतिनिधी आणि स्थानिक प्रशासकीय अधिकान्यांच्या उपस्थितीत पारंपरिक पद्धतीने जलपूजन करून 'पाणी उत्सव' साजरा केला जाणार आहे. धरण पूर्ण क्षमतेने भरल्यांने परिसरात समाधानांचे वातावरण निर्माण झाले आहे.
0 Response to "इटियाडोह धरण ओवरफ्लो."
एक टिप्पणी भेजें